30 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरविशेषराज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार

राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार

पाण्याचा थेंब थेंब वाचवला लागणार. जलसिंचनाची काम करावी लागणार. जलयुक्त शिवाराशिवाय पर्याय नाही

Google News Follow

Related

राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ बक्षिस वितरण सोहळा’ पुण्यात बालेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत उपस्थिती लावली. अभिनेता आणि पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान आणि शेतकरी मोट्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, बारा तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. आता निर्णय घेतला आहे की अॅग्रीकल्चर फीडर सोलरवर आणणार, त्यामुळे दिवसा बारा तास वीज शेतकऱ्यांना मिळेल. ५० टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र अवर्षणग्रस्त आहे. पाऊस कमी पडतो. त्यामुळे जलसंधारणाची गरज आहे. महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय पर्याय नाही असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

अमेरिकेत ‘भारतीयांना’ आता सहज ‘व्हिसा’ मिळणार

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

यावर्षी अलनिनो असणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा थेंब थेंब वाचवावा लागणार आहे, जलसिंचनाची काम करावी लागणार आहेत.जलयुक्त शिवाराशिवाय पर्याय नाही. यासाठी पाणी फाऊंडेशन खूप चांगले काम करत आहे. २०१७ सारखा दुष्काळ पुन्हा पडू नये याकरता आम्ही विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. पण समजा अतिवृष्टी किंवा अवर्षण आलंच तरी शेतकरी थांबला नाही पाहिजे, याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ज्या गावात जलसंधारणाचं काम पूर्ण झालंय त्यांनी योग्य स्ट्रक्चर करायला सुरुवात करण्याची गरज उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

४० हजार नाही, चार लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा

अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले , पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ४० हजार शेतकऱ्यांना समृद्ध केलं आहे. परंतु, ४० हजार हा आकडा लहान आहे. त्यामुळे आता ४० हजार नाही, चार लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, असं आवाहन आमिर खान यांना करून फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना तुम्ही हनुमान उडी मारायला सांगितली. पण आम्ही तुम्हाला दरवर्षी सांगतोय की तुम्हालाही हनुमान उडी घ्यावी लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,881चाहतेआवड दर्शवा
2,031अनुयायीअनुकरण करा
65,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा