28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामामुंबईच्या 'सीए'ने इगतपुरीत केली आत्महत्या

मुंबईच्या ‘सीए’ने इगतपुरीत केली आत्महत्या

बलात्काराच्या गुन्ह्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

Google News Follow

Related

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे मुलुंडला राहणाऱ्या एका ४४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने (सीए) रविवारी सकाळी आत्महत्या केली. सीए हा शनिवारी रात्री त्याच्या वाहन चालकासह इगतपुरी येथील हॉटेलमध्ये गेला होता, सोमवारी ते येथून निघतील असे त्याने वाहन चालकाला सांगितले होते. या सीएवर भांडुप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. २६ जानेवारी रोजी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने दुसऱ्या दिवशी परत येईन, असे सांगितले होते मात्र तो पोलीस ठाण्यात न जाता थेट इगतपुरी येथे आला होता.

रविवारी सकाळी, इगतपुरीच्या हॉटेलमधील एका हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना फोन करून खोली क्रमांक F003 मधून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याचे माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसानी बनावट चावीने दार उघडले असता शनिवारी आलेल्या गेस्टने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले.

चिराग वरैया (४४) रा. मुलुंड (प.) असे त्याचे नाव आहे. त्याचा ड्रायव्हर पुढच्या खोलीत थांबला होता, इगतपुरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली व पुढील तपास सुरू केला असता सीए चिराग वरैया हे मुलुंड (प.), जेएसडी रोड येथील रहिवासी होते, त्याच ठिकाणी त्याचे कार्यालय होते. वरैया हे मुंबई उपनगरातील प्रसिद्ध सीए होते. वरैया यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यातून ही आत्महत्या झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरैया विरुद्ध जानेवारी २०२३ मध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप करत एफआयआर नोंदवला होता.

हे ही वाचा:

जनआक्रोश मोर्चामुळे एमआयएमला उकळ्या?

राज्यसेवा मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना यश

भारतविरोधी षडयंत्राची उकल आयएमएफच्या अहवालात…

सोमय्यांनी हिंमत असेल तर समोर यावे,

“२६ जानेवारी रोजी चिरागला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, भांडुप पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक आणि तपास अधिकारी त्यासाठी उपस्थित होते. चिराग हा त्याच्या वकिलासोबत आला होता,” एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “चौकशीनंतर त्यांना २७ जानेवारीला पुन्हा बोलावण्यात आले,”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरैया २७तारखेला दिसला नाही पण दुसऱ्या दिवशी त्याच्या ड्रायव्हरला घेऊन इगतपुरीला गेला. पोलीस सूत्रांनी असेही सांगितले की बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडिता हिच्यावरही मुलुंड पोलीस ठाण्यात वरैया आणि इतर ३ जणांनी जानेवारी २०२२ मध्ये सुमारे १कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

इगतपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी वसंत पठाडे म्हणाले, “आम्हाला वरैयाकडून एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने आपण थकलो आहोत आणि आपले जीवन संपवत असल्याचे लिहिले आहे. त्याने त्यात कोणाचेही नाव घेतलेले नाही,” असे इगतपुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी वसंत पठाडे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा