34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामासीबीआयच्या सुबोध जैसवाल यांना सीआयडीचे समन्स

सीबीआयच्या सुबोध जैसवाल यांना सीआयडीचे समन्स

Google News Follow

Related

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले असून त्यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर गुन्हे शाखेत उपस्थित सांगण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल असून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना देखील यापूर्वी सायबर सेलने समन्स जारी केले होते.

सुबोध जैस्वाल हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख असून जेष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्त तसेच राज्याचे पोलीस महासंचालक पद भूषवल्यानंतर जैसवाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. सुबोध जैस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना अधिकाऱ्याच्या बदल्याप्रकरणात राज्य गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते. या फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलीसाच्या सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एसआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला असताना हे फोन टॅपिंगचा प्रकार झाल्याचे समोर आले होते. हे  फोन टॅपिंग बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्कालीन जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना देखील चौकशीसाठी समन्स जारी केले होते.

हे ही वाचा:

पवित्र पोर्टलमध्ये होते आहे ‘अपवित्र’ भरती

बेस्ट भाडेवाढ टळली; पण तोटावाढ सुरूच!

तब्बल २१ वर्षांनंतर तरी ती ‘जखम’ भरून निघेल?

 

जैस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना फोन टॅपिंग प्रकरण घडल्यामुळे या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकी यांना याबाबत काही माहिती होती का ? एसआयडी (राज्य गुप्तचर विभाग) यांच्याकडून पोलीस महासंचालक कार्यालयाला कळविण्यात आले होते का ? याबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शनिवारी सुबोध जैस्वाल यांना ई – मेल च्या माध्यमातून समन्स पाठवण्यात आले असून १४ ऑक्टोबर रोजी सायबर गुन्हे शाखा वांद्रे कुर्ला संकुल येथे हजर राहण्यास सांगितले आहे. जैस्वाल यांना समन्स पाठवण्यात आले असल्याबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा