32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषपवित्र पोर्टलमध्ये होते आहे 'अपवित्र' भरती

पवित्र पोर्टलमध्ये होते आहे ‘अपवित्र’ भरती

Google News Follow

Related

शिक्षक भरतीतील गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल आणले. परंतु हे पोर्टल केवळ नाममात्र उरले आहे. बहुतांशी संस्थाचालक या पोर्टलला डावलून त्यांना हवी तशी भरती करत आहेत. त्यामुळेच या भरतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आता निदर्शनास येत आहे.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये पोर्टलवरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासन नियमांना तिलांजली देत संस्थाचालक पात्र उमेदवारांना डावलत असल्याचे सध्या लक्षात येत आहे. सध्याच्या घडीला खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरतीदरम्यान होणारा गैरप्रकार थांबवण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी पात्र उमेदवारांना मुलाखतीपासून डावलण्यात आल्याचे लक्षात येत आहे.

मुख्य बाब म्हणजे आर्थिक गैरव्यवहार करून मर्जीतील उमेदवारांची निवड होत आहे. असा आरोपच आता करण्यात येत आहे. त्यामुळेच आता पवित्र पोर्टलच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. अनुदानित शाळांमध्ये त्याचबरोबर विनाअनुदानित शाळांमध्ये सध्याच्या घडीला रिक्त पदांवर भरती सुरू झालेली आहे. परंतु, ही भरती करताना समान संधी देण्यात मात्र येत नाहीये. त्यामुळेच पवित्र पोर्टलच्या कारभाराविषयी अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

सध्या पोर्टलच्या माध्यमातून २०६२ रिक्त जागांकरिता भरती केली जात आहे. येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्याच अनुषंगाने मुलाखत तसेच अध्यापन कौशल्य करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलवावे, असा नियमच आहे. परंतु पोर्टल’च्या माध्यमातून सुरू असलेल्या मुलाखतींमध्ये मात्र काहीतरी गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ सुरु आहेत अशा तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येत आहेत.

 

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कार्यकारिणीचा कार्यकाळ ३ ऐवजी ५ वर्षे कसा काय झाला?

कोळीवाडे, गावठाण, जीर्ण इमारतींच्या विकासाला हिरवा कंदिल

बेस्ट भाडेवाढ टळली; पण तोटावाढ सुरूच!

 

निवडलेल्या उमेदवारांना आयत्या वेळी डावलण्यात येत असल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. निवडलेला उमेदवार खासगी शिक्षण संस्थेत गेल्यास त्याला प्रवर्ग आरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. हे असे प्रकार सध्याच्या घडीला घडत आहेत. तसेच उमेदवारांना काहीबाही कारणे देऊन पदासाठी पात्र नसल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय मुलाखतीसाठी कमी अवधी दिल्यामुळे उमेदवार ठरलेल्या दिवशी पोहोचणार नाही अशा गोष्टी घडत आहेत. अनेक संस्थांनी तर पोर्टलला डावलून विविध रिक्त पदांवर आपल्या मर्जीतील उमेदवारांची भरती सुद्धा केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा