28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामामुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र

मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र

Related

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अर्थात एनसीबीकडून सध्याच्या घडीला मोठी धरपकड सुरु आहे. असे असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी सुद्धा आता ड्रगसफाई करण्यास सुरुवात केलेली आहे. नुकतेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन हजार ५७५ आरोपींना अटक केली आहे.

पहिल्या आठ महिन्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच अटक केलेल्यांकडून तब्बल ८७ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालेले आहे. तस्करीची साखळी तोडण्यासाठी सर्व पातळीवर पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केलेली आहे. यामधून पोलिसांनी कोकेन, हेरॉइन, चरस, एमडी, गांजा याचबरोबर एलसीडी डॉट्स, नशेच्या गोळ्या तसेच मोठ्या प्रमाणात कफ सिरपचा साठादेखील पोलिसांनी जप्त करण्यात आलेला आहे.

सध्याच्या घडीला मुंबई पोलिस तसेच गुन्हे शाखेकडून अमली पदार्थविरोधी पथकाच्या वतीने मुंबईत ड्रग्जची तस्करी, विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. मुंबई हे आर्थिक राजधानीचे केंद्र आहे. त्यामुळेच या मायानगरीमध्ये सर्व स्तरातील लोकांचा राबता आहे. याच अनुषंगाने ड्रग तस्करांना हे शहर त्यांचा माल विकण्यासाठी अधिक सोयीचे झालेले आहे. शिवाय शहरामध्ये विविध मार्गांनी अमली पदार्थ आणण्यास वावही आहे.

 

हे ही वाचा:

तब्बल २१ वर्षांनंतर तरी ती ‘जखम’ भरून निघेल?

कोळीवाडे, गावठाण, जीर्ण इमारतींच्या विकासाला हिरवा कंदिल

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कार्यकारिणीचा कार्यकाळ ३ ऐवजी ५ वर्षे कसा काय झाला?

बेस्ट भाडेवाढ टळली; पण तोटावाढ सुरूच!

 

यामध्ये बस, रेल्वे, समुद्र अशा वेगवेगळ्या मार्गांनी अमली पदार्थ आणले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे तरुण पिढी सध्याच्या घडीला अमली पदार्थांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. त्यामुळेच अनेकजण अमली पदार्थांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. या सर्व गोष्टींवर आळा घालता यावा म्हणून, आता मुंबई पोलिसांनी धाडसत्र तसेच धरपकड सुरु केलेली आहे.

२०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, यामध्ये एकूण ८८ गुन्हे दखल केले आहेत. तसेच १२९ आरोपींना अटकही करण्यात आलेली आहे. ६० कोटी रुपयांचे ड्रग आरोपींकडून हस्तगत करण्यात मुंबई पोलिस यशस्वी झालेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा