27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरक्राईमनामातिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल

तिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल

तिरुपती देवस्थानला अमूल तूप पुरवत नसल्याचे केले स्पष्ट

Google News Follow

Related

तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये वापरण्यात आलेले तूप अमूल कंपनीने पुरवल्याचा दावा करणाऱ्या खोट्या अहवालानंतर अमूल कंपनीने अहमदाबादमधील सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमूलची प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी खोटी आणि चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून खळबळ उडालेली असताना अमूलने त्यांच्यावर होत असलेल्या खोट्या आरोपांवर ठोस पाऊल उचलले आहे.

अमूलने केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, अमूल कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींनी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पोस्ट केली आहे. शिवाय प्रसादामध्ये वापरलेले तूप अमूल कंपनीने पुरवल्याचा खोटा दावा केला आहे. यावर आळा घालण्यासाठी म्हणून अमूलने अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचकडे तक्रार दाखल केली आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी या सष्टीकरण देनाता म्हटले आहे की, “तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये वापरण्यात येणारे तूप भेसळयुक्त असल्याचा आरोप करणाऱ्या पोस्ट अनेक दिवसांपासून फिरत आहेत. दरम्यान, काही जणांनी असा दावा केला आहे की, हे तूप अमूल कंपनीने पुरवले आहे. पण, स्पष्ट हे करायचे आहे की, अमूलने तिरुपती देवस्थानमला तूप पुरवले नाही. अमूलला या वादात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामुळेच आम्ही अहमदाबाद सायबर क्राइममध्ये एफआयआर दाखल केला आहे.”

हे ही वाचा..

प्रसादाच्या लाडूला पुन्हा मिळाले पावित्र्य

हवाई दलाच्या प्रमुख पदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती

तिरुपती लाडू प्रकरण ; पुरवठादार काळ्या यादीत

टीडीपी नेते गांडी बाबाजींचा वायएसआर काँग्रेसवर हल्लाबोल

“अमूलबाबतीत होत असलेल्या खोट्या प्रचाराचा आणि चुकीच्या माहितीचा परिणाम अनेक कुटुंबियांच्या उपजीविकेवर होऊ शकतो त्यामुळेच ही चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. वाद निर्माण झाल्यापासून, आम्ही आमच्या सोशल मीडियाचाही वापर केला आहे. अमूलने तिरुपती देवस्थानमला कधीही तूप पुरवठा केला नाही. आम्ही वर्षानुवर्षे प्रीमियम तूप ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत,” असेही जयेन मेहता पुढे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा