28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामासायबरमधून अर्ज भरताय, मग विद्यार्थ्यांनो खिसा खाली करा!

सायबरमधून अर्ज भरताय, मग विद्यार्थ्यांनो खिसा खाली करा!

Google News Follow

Related

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कॉलेजचे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. सायबर कॅफेमधून हे अर्ज भरत असताना चांगलाच खर्च विद्यार्थ्यांच्या माथी मारला जात आहे.

विद्यार्थ्यांना त्यासाठी तब्बल ५०० रुपये मोजावे लागत आहेत. कोरोनामुळे पालकांना विद्यार्थ्यांची फी भरणेच कठीण असताना प्रवेशप्रक्रियेसाठीही विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. मागील वर्षापर्यंत अर्जासाठी १०० रुपये भरावे लागत होते आणि आता त्याचसाठी ५०० रुपये भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मागील वर्षापर्यंत १२ वी नंतरच्या कॉलेज प्रवेश अर्जासाठी शंभर रुपयांची पुस्तिका मिळत असे. त्या पुस्तिकेसोबत असलेल्या अर्जाला कागदपत्रे जोडून प्रवेश घेता येत असे. पण या वर्षी ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे सायबर कॅफेची मदत विद्यार्थ्यांना घ्यावी लागत आहे.

सायबरमध्ये ऑनलाईन अर्जाचे १०० रुपये, विद्यापीठ शुल्क १५० रुपये, कागदपत्र स्क्रीनिंगसाठी प्रत्येक कागदामागे १० रुपये म्हणजेच १० कागदांचे १०० रुपये आणि सायबर कॅफेचे शुल्क १०० रुपये असे मिळून ४५० रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी विद्यापीठ शुल्क प्रवेश अर्जासोबत आकारले जात नव्हते, मग याच वर्षी हे शुल्क का आकारले जात आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कॅफेचालक स्वतःच्या खात्यावरूनच व्यवहार करून विद्यार्थ्यांकडून रोख घेत असल्यामुळे अर्जासोबत नक्की किती शुल्क भरले जाते याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतच नाही.

हे ही वाचा:

झोमॅटोच्या आयपीओनंतर गुंतवणूकदारांना हा नवा पर्याय

तिसऱ्या अपत्यामुळे आली आपत्ती; कर्मचाऱ्याला बसला झटका

राज्यातल्या सत्तेतले दोन पक्ष ऑनलाइन भांडले

प्रवाशांनो! तुमचे सामान रेल्वेकडे अधिक सुरक्षित

प्रवेश निश्चित झाल्यावर विद्यापीठाच्या फीमधून या शुल्काची भरणी केली जाते, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. फीच्या नावाखाली लूट करणाऱ्या सायबर कॅफेचालकांना समज देण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. एका महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होईल की नाही, याची खात्री नसताना अनेक विद्यार्थी दोन किंवा अधिक महाविद्यालयात अर्ज करत असतात अशा विद्यार्थ्यांना हा आर्थिक भुर्दंड परवडेनासा झाल्याने यावर उपाय काढण्याची मागणी केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा