27 C
Mumbai
Thursday, March 30, 2023
घरक्राईमनामावसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

बनावट विवाह सर्टिफिकेट तयार करून , ३० लाखांची खंडणी पण मागितली

Google News Follow

Related

मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली असून नाही दिल्यास गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या सगळ्या प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
अलपिया शेख या महिलेच्या नावाने व्हाट्सअँप मेसेज करून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे यांच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट बनवून खंडणी मागितली. खंडणीची रक्कम पुण्यातील खराडी येथील आय टी , थांब्यावर इनोव्हा गाडीत ठेवण्यास सांगितले. अशा आशयाचा मेसेज व्हाट्ससप्पवर आला होता. याशिवाय त्याला  आलेले   विवाहाचे सर्टिफिकेट सगळीकडे व्हायरल करण्याची धमकी पण देण्यात आली होती.  खंडणी न दिल्यास त्याला गोळ्या घालण्याची धमकी सुद्धा मिळाली होती. रुपेश मोरे हे जास्त कोणाच्या अध्यात मध्यात नसल्याने वसंत मोरे यांना चिंता वाटू लागली. म्हणूनच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित तपास सुरु केला आहे. ह्या मॅरेज सर्टिफिकेटवर औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामधल्या वडगाव गावाच्या ग्रामसेवक यांच्या सहीचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे आता पुणे आणि औरंगाबाद मध्ये आता या प्रकरणाचा तपास होणार आहे.  रुपेश मोरे यांना काहीच दिवसांपूर्वी ‘सावध राहा’ अशी धमकी आली होती. रुपेश यांच्या  गाडीवर  हि धमकीची चिट्ठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. १२ जूनला  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित पुण्यातील कात्रज परिसरांत भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्याचे काम रुपेश यांच्यावर वसंत मोरे यांनी सोपवले होते. रुपेश यांची गाडी शाळेच्या मैदानात लावली असता,  त्याच दरम्यान कोणी तरी गाडीच्या वायपरमध्ये “सावध रहा रुपेश” अशी चिट्ठी लावली होती जी रात्री घरी गेल्यावर वसंत मोरे यांनी बघितली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा