30 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरक्राईमनामाडॉक्टरनेच विकले बाळाला... किंमत ऐकून व्हाल हैराण!

डॉक्टरनेच विकले बाळाला… किंमत ऐकून व्हाल हैराण!

Google News Follow

वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी घटना नुकतीच कामोठे येथे घडली आहे. कामोठे येथील एका क्लिनिक चालवणारे डाॅक्टर यांनी पेशाला काळीमा फासलेला आहे. या डाॅक्टरांचे नाव पंकज गोपालराव पाटील असे आहे. यांनी एका बाळाची चार लाखांत विक्री केल्याचे आता समोर आलेले आहे. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी त्यांना आता अटक केलेली आहे. एका बाळाची विक्री करण्याप्रकरणी डाॅक्टर तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तीन महिलांना कामोठे पोलिसांनी सापळा रचून अटक केलेली आहे.

डाॅक्टरांचा फॅमिली हेल्थ या नावाने दवाखाना आहे. सध्या हा दवाखाना कामोठे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. या डाॅक्टरकडून एका बाळाची विक्री होत असल्याची खबर पोलिसांना लागली होती. ही विक्री ४  लाखांमध्ये होणार होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महाला यांनी पोलीस नाईक मंथन पाटील, खासगी पंच आणि खबरी यांची मदत घेतली.

ही मदत घेऊन त्यांना या डाॅक्टर पर्यंत पोहोचण्यासाठी सापळा रचला होता. याकरता बाळ खरेदी करण्यासाठी पोलिस नाईक पाटील चार लाखांची रक्कम स्वतः घेऊन दवाखान्यात गेले. यामध्ये पोलिसांनी काही बनावट नोटांचा वापरही केला होता. डाॅक्टरकडे गेल्यानंतर त्या डाॅक्टरने लगेच एका महिलेला फोन लावला आणि बाळाला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर तळोजा येथून तीन महिला बाळासह दवाखान्यात आल्या.

हे ही वाचा:

गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

आता काँग्रेसशी चर्चेची वेळ निघून गेली

चीनच्या नव्या कुरापती, नदी प्रदूषित करण्याचा डाव

‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत’

डाॅक्टरांना पैसे देऊन पाटील यांनी बाळ ताब्यात घेतले. त्यानंतर या तीन महिलाही निघून गेल्या. या निघून जात असतानाच पोलिसांनी यांना पकडले आणि त्यानंतर डाॅक्टरला अटक करून ताब्यात घेतले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा