33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरराजकारण'एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत'

‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत’

Related

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट असताना आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पडळकर यांनी थेट सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घालत संताप व्यक्त केले असून आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे, तरीही अशा वेळी ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप देखील आमदार पडळकर यांनी केला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री हे आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोलाही पडळकरांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

… वरळीतले मच्छिमार म्हणताहेत, बंद करा कोस्टल रोड!

पंतप्रधान मोदी झाले शिवतांडव स्तोत्रात तल्लीन

आर्यन खानची आता होणार सुटका

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने काल आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. तसेच, आतापर्यंत राज्यात २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आजही एका कर्मचाऱ्याच्या मुलाने वडिलांच्या तुटपुंज्या पगारामुळे शिक्षण घेता येत नाही या कारणामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आतापर्यंत राज्य सरकारचा एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केलेली नाही, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा