33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाएका वर्षात मुंबईत पकडलेल्या अमलीपदार्थ विक्रेत्यांचा आकडा धक्कादायक

एका वर्षात मुंबईत पकडलेल्या अमलीपदार्थ विक्रेत्यांचा आकडा धक्कादायक

Google News Follow

Related

मायानगरी म्हणून ओळख असणारी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता ड्रग्सचीही राजधानी बनत आहे.

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या एका वर्षात सुमारे १५० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत आणि या कारवाई दरम्यान अनेक परदेशी आरोपींसह सुमारे ३०० अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. एनसीबी कडून प्रसिध्द केलेला आकडा ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंतचा आहे.

जून २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर एनसीबीच्या कारवायांना जोर आला आणि तेव्हापासून मुंबईत अमलीपदार्थ पुरवठ्याबाबत त्यांची कारवाई सतत चालू आहे. सुशांत ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यानच मुंबईत पसरलेल्या अमलीपदार्थ पुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश झाला, त्यामुळे आतापर्यंत कारवाईमध्ये अनेक मोठे अमलीपदार्थ विक्रेते, पुरवठादार, टोळ्या आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार समोर आले आहेत. एनसीबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात एनसीबीने अमलीपदार्थ प्रकरणी सुमारे १०० प्रकरणे नोंदवली आहेत.

हे ही वाचा:

राज्यात वाढले अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार

मुंबईत वाहन चालवणे जगात सर्वाधिक तणावपूर्ण!

… म्हणून आसाममध्ये जाळली गेंड्यांची शिंगे!

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

कारवाई दरम्यान सुमारे १५० कोटी किमतीचे विविध अमलीपदार्थ जप्त करताना सुमारे ३०० अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादार पकडले गेले आहेत. त्यापैकी ४३ गुन्हेगार परदेशी आहेत. एका वर्षभरात ६७ किलो कोकेन, ४१ किलो चरस, २९२ किलो गांजा, १२ किलो एमडी, ८ किलो हेरॉईन आणि इतर अनेक अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईत कोकेन आणि चरसची मागणी प्रचंड वाढली असून वेगवेगळ्या राज्यांतून आणि परदेशातून मुंबईत वेगवेगळ्या मार्गांनी पुरवली जात आहे. बुधवारी (२२ सप्टेंबर) मुंबई विमानतळावर तब्बल २५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा