पुण्यात काही दिवसांपूर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्यासह देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली होती. अशातच आता पुण्यातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. एक आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने रस्त्यातच लघुशंका केली. यानंतर स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले, तेव्हा युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणे नगर रोडवर शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेमध्ये असणाऱ्या तरुणाने रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. जाब विचारल्यानंतर या तरूणांनी अश्लील कृत्य केलं. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला.
या घटनेनंतर आता पुण्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदर घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मद्यधुंद तरुणांना हटकल्यानंतर त्यांनी अश्लील हावभाव करून दाखवले आणि गाडी वाघोलीच्या दिशेने वेगाने पळवली. पोलिसांनी गाडीचा नंबर नोंद करून घेतला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.
हे ही वाचा..
पंतप्रधान मोदींचे महिला सशक्तीकरणात अद्भुत कार्य
इस्रायल सीमेवर गोळीबारात ठार झालेला भारतीय तरुण नोकरी आमिषाचा ठरला बळी; कुटुंबाचा दावा
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांकडे
कोथरूडमध्ये शुल्लक कारणावरून मारहाणीची घटना
पुण्यातील कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादावरून रिक्षाचालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली. यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. तरुणाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलीसांनी सचिन मिसाळ नावाच्या व्यक्तीला या प्रकरणात अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.