27 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरविशेषधर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशी देणार

धर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशी देणार

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची महिला दिनी मोठी घोषणा

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात धर्मांतराला परवानगी दिली जाणार नसून धर्मांतर करणाऱ्यांना मृत्युदंड दिला जाईल. मोहन यादव म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य कायद्याद्वारे, आम्ही अशी तरतूद करत आहोत की आमचे सरकार धर्मांतर करणाऱ्यांना फाशी देईल. आम्ही समाजात चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही. यावर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. बळाचा वापर करून किंवा लोकांना आमिष दाखवून दुष्कृत्य करणाऱ्यांना आमचे सरकार सोडणार नाही. अशा लोकांना जगण्याचा अधिकार द्यायचा नाही. याशिवाय सरकारी महिला कर्मचाऱ्यांना सात दिवसांची कॅज्युअल रजा दिली जाईल. कंत्राटी नोकरी करणाऱ्या बहिणींना १८० दिवसांची प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला जात आहे.

बळजबरीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने पावलं उचलली आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी धर्मांतरण करायला लावणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी घोषणा केली आहे. मोहन यादव म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य कायद्याच्या माध्यमातून आम्ही तरतूद करत आहे की जे धर्मांतरण करायला लावतील त्यांना आमच्या सरकारकडून फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जात आहे.

विरोधकांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करतात. विरोधी पक्ष बोलत राहतील आणि आम्ही आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत राहू. विरोधी पक्षाने कधीही महिलांना पैसे दिले नाहीत. आज संपूर्ण देश ही योजना मध्ये राबविली जात आहे. बहिणींना ४५० रुपयांना सिलिंडर देत आहोत. माता आणि बहिणीही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत. उद्योगांमध्ये काम करणाऱ्या भगिनींना विशेष सुविधा दिल्या जात आहेत.

धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची तरतूद करण्याच्या मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या घोषणेवर भोपाळच्या महिलांनी आनंद व्यक्त केला आहे आणि हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. बऱ्याच वेळा इतर धर्मातील तरुण मुलींना चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडत असत किंवा दबाव आणत असत. या कायद्यानंतर अशा कारवायांना आळा बसेल. दरम्यान, भाजप प्रवक्ते शिवम शुक्ला म्हणाले की, मध्य प्रदेश सरकार धर्मांतराची प्रकरणे थांबवण्यासाठी सतत काम करत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे; यामुळे धर्मांतराच्या घटनांना निश्चितच आळा बसेल.

हे ही वाचा..

पुण्यात बीएमडब्लू रस्त्यात उभी करून मद्यधुंद तरुणांचे अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान मोदींचे महिला सशक्तीकरणात अद्भुत कार्य

महिला समाजाचा कणा

इस्रायल सीमेवर गोळीबारात ठार झालेला भारतीय तरुण नोकरी आमिषाचा ठरला बळी; कुटुंबाचा दावा

काँग्रेस प्रवक्ते अवनीश बुंदेला म्हणाले की, धर्मांतराचे प्रकरण असो किंवा आदिवासी दलितांवरील अत्याचार असो, सर्व प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकारमध्ये नियम बनवले जातात, पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा