29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरक्राईमनामाबहीणभाऊ बुडाल्याचे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झाले उघड

बहीणभाऊ बुडाल्याचे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झाले उघड

रविवारी त्यांच्या कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दर रविवारी तलावाच्या ठिकाणी येत असत.

Google News Follow

Related

डोंबिवलीतील दावडी परिसरातील तलावात पाळीव कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी गेलेला तरुण आणि त्याची अल्पवयीन बहीण रविवारी दुपारी बुडाल्याची घटना घडली. रणजीत (२२) आणि कीर्ती रवींद्रन (१६) दर रविवारी त्यांच्या कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दर रविवारी तलावाच्या ठिकाणी येत असत. मात्र या रविवारी ते नकळत पाण्यात ओढले गेले असावेत, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पाण्याकडे पाहून कुत्रा सतत भुंकत असल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या दुर्घटनेने दोघांचे नातेवाइक आणि शेजारी हादरले आहेत. रणजीतने नुकतेच एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर एका खासगी रुग्णालयात इंटर्नशिप केली होती. तर, बहीण कीर्ती १२वीत होती. रणजीत आणि कीर्ती रवींद्रन ही भावंडं वडील रवींद्रन आणि आई दीपा यांच्यासोबत राहत होती. रवींद्रन हे मुंबईत एका खासगी कंपनीत काम करतात तर आई दीपा घरी शिकवणी घेतात. भावंडांनी त्यांच्या कुत्र्याला स्कूटरवरून तलावाच्या ठिकाणी नेले होते.

शनिवारी रात्री १२च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्थानिकांना तलावाकडे पाहून एक कुत्रा सतत भुंकताना दिसला. त्यामुळे घटनास्थळी काहीतरी घडले असावे, असा संशय निर्माण झाला. घटनास्थळी पोहोचल्यावर स्थानिकांना तलावाजवळ एक स्कूटर उभी असलेली दिसली. कोणीतरी बुडाला असावा असा संशय आल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. “आम्हाला शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास फोन आला, त्यानंतर एक पथक घटनास्थळी पोहोचले. सुमारे दीड तासानंतर पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले,” अशी माहिती अग्निशमन अधिकारी यशवंत घंगाळे यांनी दिली. “दोघांना तलाव किती खोल आहे, हे समजले नसावे आणि ते आणखी आत गेले असावेत,’ अशी शक्यता घंगाळे यांनी वर्तवली.

हे ही वाचा:

मणिपूरमधील हिंसाचारात ४० दहशतवादी ठार

मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…

आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

शिक्षणविरोधी तालिबानच्या नाकावर टिच्चून ती झाली आयआयटी पदवीधर

‘ही दोन्ही भावंडं खूप चांगल्या स्वभावाची होती. त्यांच्यासोबत असे काही घडू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. दोघांचे त्यांच्या पाळीव कुत्र्यावर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम होते आणि तलावाला भेट देणे हा त्यांचा दर रविवारचा कार्यक्रम होता,’ असे या मुलांवर पोटच्या मुलांसारखे प्रेम करमारे शेजारी दयानंद खेडेकर यांनी सांगितले. आम्ही अद्याप पालकांना कळवलेले नाही. त्यांच्या आईचे नुकतेच हर्नियाचे ऑपरेशन झाले आहे. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे मृतदेह केरळमधील त्यांच्या मूळ गावी नेला जाईल, असे एका नातेवाइकाने सांगितले. स्थानिक पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा