32 C
Mumbai
Monday, June 1, 2026
घरक्राईमनामामुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हल्ल्याचा कट; ८ अटकेत

मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हल्ल्याचा कट; ८ अटकेत

आयएसआयशी संबंधित दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

Google News Follow

Related

मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हल्ल्याचा कट; ४ हँड ग्रेनेड, पाकनिर्मित २ पिस्तुले जप्त आयएसआयशी संबंधित दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त, ८ जण अटकेत
मुंबई : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आणि परदेशातून संचालित केल्या जाणाऱ्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत आठ जणांना अटक केली आहे. या मॉड्यूलचे सूत्रधार आयएसआय हँडलर शाहजाद भट्टी, मुन्ना झिंगाडा आणि यावर खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्ली, मुंबई, पंजाब आणि चंदीगडमध्ये महत्त्वाच्या ठिकाणांवर तसेच सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची तयारी करत होते. या कारवाईत चार हँड ग्रेनेड, पाकिस्तानमध्ये बनविलेली दोन ग्लॉक पिस्तुले आणि २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे समन्वित कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशातील राजाराम, झारखंडमधील नितीश कुमार, महाराष्ट्रातील तौफिक उर्फ मुनिर मुल्ला व सजिद मेहबूब शेख, पंजाबमधील हरविंदर सिंग, गगनदीप सिंग आणि मनजित सिंग यांचा समावेश आहे. तसेच नेपाळमधील लामा उर्फ कामी लामा यालाही अटक करण्यात आली आहे.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुनिर मुल्ला हा या मॉड्यूलचा प्रमुख समन्वयक होता. त्याचे आयएसआय हँडलर यावर खान आणि मुन्ना झिंगाडा यांच्याशी थेट संपर्क होते. दिल्ली आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते.

हे ही वाचा:

दुधासाठी रडणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा पित्याकडून खून

रेतीच्या ढंगानी राजस्थानचे पाच जिल्हे व्यापले

सेमीकंडक्टर उद्योगाचा नवा रोडमॅप: भारत आता ‘गॅलिअम’ वळणावर

कपडे फाडले, अंडी फेकली… ‘चोर चोर’च्या घोषणा देत अभिषेक बॅनर्जींना थोबडवले

पंजाबमधील तीन आरोपींना मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी हँड ग्रेनेड आणि शस्त्रे पुरविण्यात आली होती, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. नेपाळी नागरिक कामी लामाची भूमिका दिल्लीत आरोपींसाठी सुरक्षित आसरा उपलब्ध करून देणे आणि आर्थिक व्यवहार सांभाळणे अशी असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध कलमे तसेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कटात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे स्पेशल सेलने सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा