34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरक्राईमनामा...असा उठवला सीएने आपल्या नावाचा फायदा! वाचा...

…असा उठवला सीएने आपल्या नावाचा फायदा! वाचा…

Related

एका चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) नावाशी साधर्म्य असल्याचा गैरफायदा एका घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.  एका तोतया सीएने ५० जणांची आणि सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तोतया सीए ही फसवणूक २०१२ पासून करत असून अखेर आर्थिक गुन्हे शाखेने कल्पेश श्यामजी शहा (४५) याला अटक केली आहे. शहा हा नावाशी साधर्म्य असलेल्या एका सीएचा नोंदणी क्रमांक वापरून ही फसवणूक करत होता.

जीएसटी विभागातील जुन्या वर्षातील नोंदी तपासण्याचे काम सुरू होते. त्यावेळी करदाते प्रकाश पवार यांच्या सेवा कर नोंदीत काही तफावत आढळली. त्यावेळी जीएसटी विभागाकडून त्यांच्या चलनाची तपासणी केली असता त्यात कराच्या रकमेत खाडाखोड केलेली आढळली. त्यावेळी पवार यांच्याकडून भरण्यात आलेली रक्कम आणि चलानमधील रक्कम तपासली असता त्यामध्ये तफावत आढळली. पवार यांनी त्यांचा सेवा कर भरण्याची जबाबदारी शहा यांना दिली होती.

हे ही वाचा:

लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!

भारतीय लष्कराची ‘आकाश’ गवसणी

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

या प्रकरणाची अधिक तपासणी केली असता पवार यांनी शहाला २६ लाख रुपये सेवा कर भरण्यासाठी दिले होते, पण शहाने केवळ चार लाख ७० हजार भरून पवार यांना २६ लाख भरल्याची बनावट पावती दिली, असे समोर आले. त्यानंतर जीएसटी विभागाने शहा याने भरलेल्या सर्व जीएसटीची तपासणी केली असता त्याने पवार यांच्याप्रमाणेच ५० व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम सात कोटी ४० लाख आहे. शहा त्याच्या ग्राहकांकडून जीएसटीच्या नावाखाली मोठी रक्कम घेऊन त्यातील कमी रक्कम जीएसटी विभागात भरून ग्राहकांना बनावट पावत्या देत असे, अशी माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना अधिकाऱ्याने दिली.

शहा याच्या नोंदणी क्रमांकाची तपासणी केली असता तो क्रमांक घाटकोपरमधील कल्पेश शहा या सीएचा असल्याचे उघड झाले. केवळ नावामध्ये असलेल्या साधर्म्यामुळे आरोपी शहा याने फायदा घेत लोकांची फसवणूक केली. या प्रकरणी जीएसटी विभागाकडून मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर आरोपी शहा याने अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली, मात्र जामीन फेटाळल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी त्याला अटक केली. न्यायलयाने शहा याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा