30 C
Mumbai
Friday, April 24, 2026
घरक्राईमनामासावधान!! गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली 'खिसा कापला'

सावधान!! गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली ‘खिसा कापला’

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Google News Follow

Related

महानगर गॅस लिमिटेडचे (एमजीएल) कनेक्शन कापले जाईल, अशी भीती दाखवून बनावट ‘एपीके’ (APK) फाइलद्वारे लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये धाडसी मोहीम राबवून पोलिसांनी तीन सराईत ठगांना बेड्या ठोकल्या आहेत.

ही टोळी ग्राहकांना मेसेज पाठवून तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत असे. त्यानंतर कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांशी संपर्क साधला जाई. गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी ‘MGL Gas Unblock APK’ नावाची एक फाइल डाऊनलोड करण्यास ग्राहकांना भाग पाडले जाई. एकदा का ग्राहकाने ही फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली की, आरोपींना त्या मोबाईलचा आणि बँकिंग डेटाचा पूर्ण ताबा मिळत असे.

कुर्ला येथील ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक उपेंद्र नारायण मुस्कुर यांना या टोळीने अशाच प्रकारे जाळ्यात ओढले. गॅस बंद होईल या भीतीने त्यांनी ठगांनी पाठवलेली फाइल डाऊनलोड केली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून २.३५ लाख रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

हरिद्वारमधील बेकायदेशीर मजार पाडली…खाली कसलेही अवशेष नव्हते!

ट्रम्प यांना पाकिस्तानची मध्यस्थी का हवी? त्याचा अखेर उघडा झाला!

सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जींच्या कृतीवर तीव्र नाराजी

“दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात आम्ही भारतासोबत”

तांत्रिक तपासाच्या आधारे सायबर पोलिसांनी या टोळीचा मागोवा घेतला. आरोपी वारंवार आपली ठिकाणे बदलत होते. मात्र, पोलिसांनी झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारपर्यंत पाठलाग करून तिघांना अटक केली. आरिफ अंसारी (२८), बिलाल शेख (२८) आणि मेहबूब आलम (२५)आरोपींकडून ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यात फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक बनावट एपीके फाइल्स सापडल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा