27.5 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरक्राईमनामामाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका

क लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची बुधवारी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. परंतु सीबीआयने जामीनावरील स्थगिती आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी अर्ज दाखल केला, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आणि सीबीआयच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन आदेशावरील स्थगिती २७ डिसेंबरपर्यंत वाढवली. होते. मात्र, त्याची आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, नेते यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना गोडधोड भरवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन वाढवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आणि त्यांचा जामीन कायम ठेवला. त्यामुळे १०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मुंबईतील आर्थर रोड कारागृहाबाहेर त्यांचे स्वागत करण्यात आले. देशमुख यांची सुटका होण्यापूर्वीच त्यांचे समर्थक तुरुंगाबाहेर उपस्थित होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ते वर्षभराहून अधिक काळ तुरुंगात होते.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

अनिल देशमुख नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात होते. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयने त्यांना एप्रिलमध्ये अटक केली होती. देशमुख यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. तो बराच काळ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. उच्च न्यायालयाने त्यांना ऑक्टोबरमध्ये ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा