25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामाअल्पवयीन मुलीने यूट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून दिला बाळाला जन्म

अल्पवयीन मुलीने यूट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून दिला बाळाला जन्म

तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाशी ओळख झाली. मुलीने आईपासून आपण गर्भवती असल्याची गोष्ट लपवली.

Google News Follow

Related

नागपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आप एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने यूट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला.त्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. आपण गर्भवती असल्याची बातमी तिने आईपासून लपवून ठेवली होती. हा प्रकार केल्यावर आईने तातडीने मुलीला रुग्णालयात भरती केले. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ही घटना नागपुरातील अंबाझरी भागात घडली आहे. तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये ओळख झाली. इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन मुलगी आरोपीच्या संपर्कात आली . दोन महिने दोघांमध्ये चॅटिंग सुरु होते. त्यानंतर आरोपीने तिला एका परिसरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर मुलगी गरोदर राहिली असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मात्र, बाळाचा मृतदेह संशयास्पद ठिकाणी आढळला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

आपण आजारी असल्याचे सांगून या मुलीने आईपासून आपण गर्भवती असल्याची गोष्ट लपवली होती कोणाला कळू नये म्हणून या मुलीने यूट्यूबवर व्हिडिओ बघायला सुरुवात केली. व्हिडिओ बघून या मुलीने स्वतःच प्रसूती करून बाळाला जन्म दिला. ही घटना घडली त्यावेळी ती घरी एकटीच होती.

रात्री घरी आल्यावर आईने आपल्या मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर या मुलीने झाललेली घटना आईला कथन केली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. नवजात अर्भकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुनाचा आरोप निश्चित केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा