33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरक्राईमनामासोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, मुंबई विमानतळावर ११ जणांना अटक

सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, मुंबई विमानतळावर ११ जणांना अटक

कॅप्स्यूलमध्ये लपवलेलं ३.५ किलो सोने जप्त

Google News Follow

Related

मुंबईमध्ये सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण वाढत आहे. सोन्याच्या तस्करी संदर्भात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन जण हे विमानतळाच्या आस्थापना भागात काम करणारे आहेत. हे सोने एका कॅप्स्यूलच्या माध्यमातून आणण्यात येत होते. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या अकरा जणांकडून ३. ५ किलो सोने जप्त केले आहे.

बँकॉक येथून मुंबईला तस्करीने सोने येत असल्याची माहिती ६ मी रोजी महसूल गुप्तचर संचलनालयाला मिळाली होती. त्यानुसार या तस्करीवर अधिकाऱ्यांनी पळत ठेवली होती. प्रत्येक कॅप्स्यूलमध्ये अर्धा आलो सोने होते आणि प्रत्येक प्रवासी अशा दोन तंटे तीन कॅप्स्यूल घेऊन प्रवास करत होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन येथे अशा पाच कॅप्स्यूल घेताना रमेश सदाशिव संके याला अटक केली. या कॅप्स्यूल ज्याला देण्यात येत होत्या त्या सचिन जुलूम या देखील तत्काळ अटक करण्यात आली. जुलूम हा विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमध्ये काम करत होता.

आणखी चौकशी केल्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी बँकाँवरून मुंबईला आलेल्या नवीन अचनतानी या तिसऱ्या आरोपीला अटक केली. अचानतानी मुंबई मध्ये उतरून दुबईला जाणाऱ्या शुभम कदम याला आपल्याकडील सोन्याच्या कॅप्स्यूल  देण्याच्या विचारात होता. अधिकाऱ्यांनी शुभम कदम याला मुंबई विमानतळावर अटक केली. कदम हा विमानतळावरील फूडकोर्टमध्ये कामाला आहे.

हे ही वाचा:

इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार

अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!

संस्कृत, काश्मिरी, कोकणी भाषांमध्ये शब्दकोश प्रकाशित होणार

अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यानंतर अचानतानी याने आपला गुन्हा काबुल केला. आपण पैसे कवण्यासाठी राहुल भटिजा उर्फ समीर उर्फ ऋषी याच्यासाठी सोन्याची तस्करी करत असल्याचे सांगितले. विमानामध्ये मध्ये चढण्यापूर्वी, थायलंडमधील प्रतुनम येथील ग्रँड रीजेंट हॉटेलच्या खोलीत भटिजा याच्या सांगण्यावरून एका व्यक्तीनेआपल्याला मेणाच्या स्वरूपात सोन्याची तीन पाकिटे दिली असे त्याने तपासात सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा