मध्य प्रदेशातील खंडवा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून स्थानिक मुस्लिम कब्रस्तानांमध्ये महिलांच्या कबरी उघडण्याच्या, आणि त्यांच्यासोबत अमानुष प्रकार घडल्याच्या घटनांनी संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
सुरुवातीला १७-१८ मे रोजी अशा प्रकारची पहिली माहिती समोर आली होती, ज्यात तीन कबरी उघडण्यात आल्या होत्या. त्यातील एक महिला होती. नंतर १९-२० मेच्या रात्री बाग कब्रस्तानात पुन्हा तीन महिलांच्या कबरी पायांच्या बाजूने उघडण्यात आल्या होत्या. या घटनांनंतर प्रशासनाने १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.
सीसीटीव्हीत दिसले दोन नग्न आरोपी
रविवार (२१ सप्टेंबर) आणि सोमवारच्या दरम्यान, पुन्हा एकदा मोठ्या बाग कब्रस्तानात दोन महिलांच्या कबरी उघडलेल्या आढळल्या. यातील एक महिला नुकतीच दफन करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचे नातेवाईक आणि मुस्लिम समाजाचे अनेक लोक घटनास्थळी पोहोचले. शहराचे काजी आणि पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी नग्न अवस्थेत कबरींच्या जवळ उभे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यापैकी एक आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कफनाचा कपडा टाकून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
तंत्रक्रिया की घृणास्पद कृत्य?
शहर काजींनी यावर गंभीर आरोप करत सांगितले की, गेल्या पाच महिन्यांत अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि विशेष म्हणजे ज्या कबरी उघडल्या गेल्या आहेत, त्यातील बहुतांश महिलांच्या आहेत. त्यांना शंका आहे की, हे कृत्य तंत्रक्रियेसाठी केलं जात आहे किंवा मृत महिलांसोबत अत्यंत घृणास्पद प्रकार केला जात आहे.
हे ही वाचा :
‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’
“… अशा भाषेची गरज नाही!” शशी थरूर संतापले!
एआय मागणी पूर्ण करण्यासाठी २ ट्रिलियन डॉलर्सच्या उत्पन्नाची गरज
पोलिसांचा तपास सुरू
या घटनांची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही व्हिडीओ जप्त करण्यात आले असून, पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील, असे अॅडिशनल एसपी महेंद्र तारनेकर यांनी सांगितले.







