29.6 C
Mumbai
Saturday, June 27, 2026
घरविशेषडोंबिवलीचा शार्दूल विचारे सीए इंटरमिजिएटमध्ये देशात पहिला

डोंबिवलीचा शार्दूल विचारे सीए इंटरमिजिएटमध्ये देशात पहिला

फाउंडेशन परीक्षेत त्याने मिळवला होता तिसरा क्रमांक

Google News Follow

Related

डोंबिवलीच्या शार्दूल सीमा शेखर विचारे याने २०२६च्या इंटरमिजीएट सीए परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सर्वसामान्य कुटूंबातील शार्दूलने मिळवलेल्या या यशामुळे सगळ्याना त्याचा अभिमान वाटत आहे.

शार्दूलने या परीक्षेत ६०० पैकी ५३१ गुण मिळवत ८८.५०% गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
त्याच्या खालोखाल कोचीच्या अभिनव सतीश याने ८८.३३ % गुण मिळवले आहेत. त्याने ६०० पैकी ५३० गुण मिळवले तर तिसरा क्रमांक तीर्थ जैन याचा आहे. त्याने ६०० पैकी ५१९ गुण मिळवले आणि त्याला ८६.५० % इतके गुण मिळाले.

आता सीए अंतिम परीक्षेची शार्दूल तयारी करणार आहे. त्याआधी त्याला २ वर्षे आर्टिकलशिप करायची आहे.
याआधी शार्दूलने सीए फाउंडेशन परीक्षेत देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. तेव्हा देखील त्याचे खूप कौतुक झाले.
या परीक्षेला १ लाख ५३ हजार ८६२ विद्यार्थी बसले होते.

हे ही वाचा:

कॅनडात खंडणी रॅकेटवर मोठा घाव; १६ भारतीयांना अटक

सेमीफायनलचे रणांगण तापले; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे महाआव्हान!

पंतप्रधान मोदींच्या सेशेल्स दौऱ्यात ‘या’ क्षेत्रांतील सहकार्य होणार मजबूत

ऑस्ट्रेलिया नॉकआउट फेरीत!

या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी असतो. कठीण परीक्षा म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. मात्र शार्दुलने आपल्या हुशारी, मेहनत आणि कष्टाच्या बळावर ही कामगिरी केली आहे.

लहानपणापासूनच शार्दुल खूप शांत, एकाग्र व्यक्तिमत्त्वाचा आहे. त्याचे छंद म्हणजे वाचन, क्रिकेट, फुटबॉल खेळणे आणि मुलांना आवडणारे मैदानी खेळ.

तो आपला शैक्षणिक प्रवास स्वयंशिस्त पद्धतीने करत आहे आणि देवाच्या कृपेने आणि त्याच्या समर्पित प्रयत्नांनी त्याला उत्तम यश मिळत आहे, असे त्याचे आईवडील म्हणतात.

त्याने २०२३ मध्ये आयसीएसई १०वी बोर्ड परीक्षेत भाग घेतला आणि ओंकार इंटरनॅशनल स्कूल डोंबिवलीमधून ९९.४% गुण मिळवले.

त्यानंतर त्याने मार्च २०२५ मध्ये मुंबईतील माटुंगा येथील आर ए पोदार कॉलेजमधून बारावीची परीक्षा दिली आणि ९५.१७% गुण मिळवले.

मे २०२५ मध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली व्यावसायिक परीक्षा म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन परीक्षा दिली आणि (ऑल इंडिया रँक ३) मिळवण्याचे अद्भुत यश मिळवले.

त्याने ११वी पासूनच सीए या क्षेत्रातच कारकीर्द करण्याचा विचार केला होता. तशी तयारी त्याची तेव्हापासूनच सुरू होती. १०वीच्या परीक्षेत दमदार यश मिळविल्यानंतर त्याने आयआयटी करावे, नीटची परीक्षा द्यावी असे अनेक पर्याय त्याला सांगितले जाऊ लागले पण त्याने कॉमर्स करत सीए होण्याचा निश्चय केला होता.

त्याला या यशात आध्यात्मिक आधारही मिळाला. शार्दुलची बहीण शर्वरी हीदेखील गुणवत्तावान आहे. ती सध्या अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या अंतर्गत एका प्रकल्पावर काम करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा