27.2 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरक्राईमनामाधारावीत आई-वडिलांनीच दीड वर्षांच्या बाळाला १ लाख ५ हजारांत विकले!

धारावीत आई-वडिलांनीच दीड वर्षांच्या बाळाला १ लाख ५ हजारांत विकले!

मामाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटले

Google News Follow

Related

धारावी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धारावी पोलिसांनी या प्रकरणी आई, वडील आणि बाळ विकत घेणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धारावीतील तेवर बिल्डिंगजवळ, मेट्रो स्टेशन टी जंक्शन परिसरात राहणारे रोली संदिप सिंग आणि संदिप जनराज सिंग या दामप्त्याने आपल्या १ वर्ष ६ महिने वयाच्या अनंत सिंग या मुलाला २ ऑगस्ट २०२६ रोजी ‘राणी’ नावाच्या एका महिलेस १ लाख ५ हजार रुपयांना विकले. आरोपींनी कोणताही कायदेशीर प्रक्रिया किंवा पद्धतीचा अवलंब न करता, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायद्यासाठी पोटच्या मुलाचा अपव्यापार केल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

अमुलच्या बनावट दुध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा

उत्तराखंडमध्ये ढगफुटीसह मुसळधार पावसाचा कहर; पूल गेला वाहून

फुकेत-दिल्ली विमानातील ऑटोपायलट बंद, हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड

मामाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटले

बालकाचे मामा आणि तक्रारदार सनी शिवबहादूर सिंग (रा. गोरेगाव) यांना या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी बहिणीकडे व भावजींकडे चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी मुलाचा मृत्यू झाल्याची आणि मृतदेह सायन रुग्णालयात असल्याचे खोटे सांगून मामाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मामाचा संशय बळावल्याने आणि कसून चौकशी केल्यावर अखेर त्यांनी बाळाला १ लाख ५ हजार रुपयांमध्ये विकल्याची कबुली दिली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा