मध्य प्रदेशातील इंदूर येथील काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) हिंदू महिलांना फसविण्यासाठी आर्थिक प्रलोभन देऊन “लव्ह जिहाद” कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू महिलांना टार्गेट करण्यासाठी पैसे देणारी व्यक्ती म्हणून अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कादरी याचे नाव घेतल्यानंतर या प्रकरणामुळे राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी बाणगंगा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींनंतर इंदूर पोलिसांनी साहिल शेख आणि अल्ताफ अली या दोन पुरूषांना अटक केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. दोन हिंदू महिलांनी आरोप केला होता की, या पुरूषांनी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांची धार्मिक ओळख लपवली आणि नंतर त्यांचे लैंगिक शोषण केले.
भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी !
गाझा युद्धविराम प्रस्तावावर चर्चा सकारात्मक
उत्तर रेल्वेच्या सहाय्यक अभियंता, ट्रॅकमनला लाच घेताना अटक
इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सामाजिक सौहार्दाला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याचा हवाला देत एनएसए लागू केल्याची पुष्टी केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आणि सांगितले की, इंदूर पोलिसांना फरार नगरसेवकाला अटक करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. “दोषी आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही. कायदा स्वतःचे काम करेल,” असे यादव यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
