उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा आज विजयी मेळावा पार पडला. दोनही भाऊ तब्बल १८ वर्षानंतर एकत्रित स्टेजवर पहायला मिळाले. यावेळी ठाकरे बंधुनी मराठी भाषेवर भर देत केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीका केली. तसेच आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता देखील दर्शविली. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर भाजपा नेते आशीष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. भाषेसाठी नाही ही तर निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता “भाऊबंदकी” आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच. महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंबतहात जिंकण्याचा प्रयत्न, असे आशीष शेलार यांनी म्हटले.
हे ही वाचा :
उत्तर रेल्वेच्या सहाय्यक अभियंता, ट्रॅकमनला लाच घेताना अटक
भाजपा नेते गोपाळ खेमका यांची गोळ्या झाडून हत्या!
पंतप्रधान मोदी अर्जेंटीना दौऱ्यावर
दरम्यान, मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा पार पडला. यावेळी उद्धव आणि राज यांच्यासह त्यांचे कुटुंब देखील एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. यावेळी मविआचे काही नेते देखील उपस्थित होते. दोनही पक्षांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी !
महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली… ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.
भाषेचे प्रेम वगैरे काही…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 5, 2025
