28.4 C
Mumbai
Wednesday, July 15, 2026
घरक्राईमनामाकल्याण शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स मुथाच्या मुलाने उडवले दुचाकीला

कल्याण शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स मुथाच्या मुलाने उडवले दुचाकीला

एकाचा मृत्यू एक जखमी

Google News Follow

Related

कल्याण शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स आणि राजकीय नेते तसेच बांधकाम व्यवसायिक असलेले प्रकाश मुथा यांचा मुलगा चालवत असलेल्या कारने एका दुचाकीला धडक देऊन पळ काढला.या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा भीषण अपघात सोमवारी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाजवळ झाला आहे.

या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात प्रकाश मुठा यांचे पुत्र अविनाश मुथा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. देवेंद्र सिंग राजपूत (वय ५१) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते उल्हासनगर येथील फर्निचर मार्केटमध्ये काम करत होते. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ते आपला मुलगा संजय राजपूत याला घेऊन दुचाकीवरून कामावर जात होते. ते शहाड येथील म्हाळूंग परिसराकडून उल्हासनगरच्या दिशेने जात असताना बिर्ला कॉलेज गेटजवळ हा अपघात घडला.
हे ही वाचा:
क्लान राइस सेमीफायनलमध्ये खेळणार?

दोन दशकांनंतर इंग्लंड-अर्जेंटिना आमनेसामने

महागाईचा नवा झटका! जूनमध्ये घाऊक महागाई ९.८७% वर

लडाखच्या संरक्षित वन्यजीव क्षेत्रात ऑफ-रोडिंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश मुथा (वय ४०) हा आपली एम.जी. इलेक्ट्रिक कार घेऊन म्हाळूंग येथील गोशाळेतून घरी परतत होता. याच वेळी भरधाव असलेल्या त्याच्या कारने राजपूत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवेंद्र राजपूत यांना उपचारासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संजयच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत; प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी अविनाश मुथा हा स्थानिक राजकारणी, बिल्डर आणि सराफ प्रकाश मुथा यांचा मुलगा आहे. अपघातानंतर त्याने पळ काढला होता, परंतु पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले की, “आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जात असून, त्याचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.” दैनंदिन दिनचर्यानुसार, देवेंद्र राजपूत हे आपल्या मुलाला शहाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा