29 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरक्राईमनामाविकी कौशल-कतरिनाला धमकी देणारा अटकेत

विकी कौशल-कतरिनाला धमकी देणारा अटकेत

Related

अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनविंदर सिंग असे या व्यक्तीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील असून तो मुंबईत चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होता. आरोपी हा अभिनेत्री कतरिना कैफचा चाहता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाकारांना इंस्टाग्रामवर धमक्या येत होत्या आणि आरोपी कतरिना कैफचा पाठलाग करून तिला धमक्याही देत ​​होता.

मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) (धमकी) आणि ३५४ (डी) (महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी आयटी कलम ६७ (अश्लील फोटो, कमेंट्स आणि व्हिडीओ पोस्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकी देण्यात आली होती. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. ५ जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं होतं

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा