28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामामोलकरणीने उशीच्या सहाय्याने केला मालकिणीचा खून; मुलगा, प्रियकरही होते सहभागी

मोलकरणीने उशीच्या सहाय्याने केला मालकिणीचा खून; मुलगा, प्रियकरही होते सहभागी

सदल महिलेच्या नातवाच्या तक्रारीवरून मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Google News Follow

Related

मालाड पश्चिम मधील ऑर्लेम अपार्टमेंटमध्ये एका ज्येष्ठ महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिला ७० वर्षीय असून तिचे नाव मेरी सेलीन डीकोस्टा असे असून बाथरूममध्ये गुडघे टेकून पाण्याच्या बादलीत बुडलेल्या स्वरूपात सदर महिलाआढळली.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तेव्हा त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांना तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.त्याबाबत मालाड पोलीस ठाण्यात कलम १७४ सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या तांत्रिक चौकशीत महिलेच्या घरात काम करणाऱ्या अपंग महिलेवर संशय असल्याने तिच्या मुलासह प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

सत्यपाल मलिक यांच्या अटकेचे वृत्त चुकीचे

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

महिला शबनम परवीन शेख ,तिचा मुलगा शहजाद शेख आणि प्रियकर मोहम्मद उमर शेख अशी आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही द्वारे यांची ओळख पटवून त्यांना अटक केली. तांत्रिक चौकशीत मयत महिलेच्या घरात काम करणारी अपंग महिला आणि तिचा एक मुलगा घरातून बाहेर पडताना दिसला. त्याचवेळी मास्क व टोपी घालून एक वयस्कर इसम घरामध्ये जाताना दिसला.

पोलिसांनी मोलकरीण शबनम परवीन शेख,तिचा मुलगा शहजाद शेख आणि प्रियकर मोहम्मद उमर शेख याना अटक करून यांच्याकडून कसून तपास करण्यात आला तेव्हा चोरीच्या उद्देशाने कट रचून मृत महिला मेरी हिचा उशीच्या सहाय्याने तोंड दाबून तिची हत्या करण्यात आली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.आरोपी शबनमचा प्रियकर मोहम्मद उमर शेख हा ७१ वर्षीय असून ता.वसई,जि.पालघर येथून पोलिसांनी त्याला अटक करून याला मालाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मृत महिलेचा नातू निल रायलोबे (२६) याने घराची पाहणी केली असता २ मोबाईल्स ,घड्याळ आणि मृत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी या वस्तू चोरीस गेल्याचे आढळले. त्याच्या तक्रारीवरून मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याआधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिला शबनम परवीन शेख ,तिचा मुलगा शहजाद शेख आणि प्रियकर मोहम्मद उमर शेख याना अटक करून कोर्टात सादर केले असता २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. त्याबाबत अधिक तपास सुरु आहे असेही पोलीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा