28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामाविश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या 'कमांड'वर नियुक्ती

विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या ‘कमांड’वर नियुक्ती

राज्यात १४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Google News Follow

मुंबई – राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल केला असून, १४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे ‘डॅशिंग’ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे-पाटील यांचे असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि त्यामुळे सरकारवर होणारी टीका, या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठीच फडणवीस यांनी नांगरे-पाटील यांच्यावर विश्वास दाखवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. विश्वास नांगरे-पाटील हे सध्या मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंघल यांच्या कार्यकाळातील कामगिरीवरून ओढवलेल्या टीकेमुळेच हा बदल झाल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!

उत्तर प्रदेशात १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील; खान सरांचे सेंटरही बंद

मुंबईचे तलाव भरू लागले! पहिल्या पावसाने मिळाला दिलासा

मान्सूनची दमदार हजेरी; मुंबईत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद

बदल्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:
विश्वास नांगरे-पाटील अप्पर महासंचालक, ACB, मुंबई ते पोलीस आयुक्त, नागपूर , रवींद्र सिंघल पोलीस आयुक्त, नागपूर ते महासंचालक, ACB, महाराष्ट्र ,संजय वर्मा म.स., न्यायिक व तांत्रिक म.स. ते पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, अर्चना त्यागी म.स. गृहनिर्माण व कल्याण महामंडळ ते म.स., न्यायिक व तांत्रिक, दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, MBVV ते पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, पुणे, संजय शिंत्रे पोलीस उपमहानिरीक्षक, सायबर, मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त, MBVV ,निलेश रोहेन पोलीस अधीक्षक, हिंगोली ते पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमंत लाड अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव ते पोलीस अधीक्षक, हिंगोली ,अभिनाज कुमार पोलीस अधीक्षक, नांदेड ते पोलीस उप-आयुक्त, पुणे शहर , प्रशांत मोहिते पोलीस उप-आयुक्त, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस उप-आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई
शशिकांत सातव पोलीस उप-आयुक्त, नागपूर शहर ते पोलीस उप-आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
रमेश धुमाळ पोलीस उप-आयुक्त, अमरावती शहर ते पोलीस उप-आयुक्त, नागपूर शहर ,प्रांजली सोनावणे पोलीस अधीक्षक, गुशिवि
अमरावती ते पोलीस उप-आयुक्त, अमरावती शहर
पीयूष जगताप समादेशक, SRPF गट १७, चंद्रपूर ते| अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव
नारायण शिरगांवकर समादेशक, SRPF गट १३, गडचिरोली ते समादेशक, SRPF गट १९, अहिल्यानगर , रुपाली अंबुरे पोलीस उप-आयुक्त, डायल ११२ (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
या प्रशासकीय बदल्यांनंतर आता राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीत किती सुधारणा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा