34 C
Mumbai
Wednesday, March 25, 2026
घरक्राईमनामा८ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलवी मोहम्मद इस्माईलला चोपले

८ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलवी मोहम्मद इस्माईलला चोपले

कानपूरमध्ये ६० वर्षीय मौलवीला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ६० वर्षीय मौलवीने आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद इस्माईल याला अटक केली आहे. कानपूरमधील कल्याणपूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी (२२ मार्च) घडली, जेव्हा मुलगी बाहेर खेळत होती. शेजारीच राहणारा आरोपी, जो एक मौलवी आहे, तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने धाडस दाखवत आरोपीला दूर ढकलले, मोठ्याने किंचाळली आणि घरी पळून गेली. तिने आपल्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल सांगितले, ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

हे ही वाचा:

चीन- पाक सीमेजवळ ‘पिनाका’ची वाढती तैनाती! २२ रेजिमेंट्सच्या तैनातीचे लक्ष्य

हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांनाच मिळणार अनुसूचित जातीचा दर्जा

कोलंबियामध्ये लष्करी C-130 विमान कोसळून ६६ जणांचा मृत्यू

२४ काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या काळ्या आठवणी ताज्या झाल्या!

मुलीच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. संतप्त जमावाने त्याला रस्त्यावरून काही अंतरापर्यंत फरफटत नेले आणि मारहाण केली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपीची जमावातून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतले. नंतर त्याला औपचारिकपणे अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व बाबींचा तपास केला जात आहे. पीडितेची ओळख उघड करण्यात आलेली नाही आणि तिच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मूळचा कानपूर देहातच्या रुरा येथील रहिवासी आहे. कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा