31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामामिद्दुखेराची हत्या मूसेवालावरील गोळीबारास कारणीभूत

मिद्दुखेराची हत्या मूसेवालावरील गोळीबारास कारणीभूत

Google News Follow

Related

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या आपण केल्याचा दावा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला आदर्श मानणाऱ्या तपन बिष्णोईने केला आहे. पण यामागे कारण आहे ते विक्रमजित सिंह तथा विकी मिद्दुखेरा याची गेल्या वर्षी झालेली हत्या. त्याची हत्या करणाऱ्यांना मूसेवालाने साथ दिली, त्याचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा दावा या तपन बिष्णोईने केला आहे, असे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे.

इंडियन एक्स्प्रेसने न्यूज १८चा हवाला देत म्हटले आहे की, बिष्णोईने दिलेल्या मुलाखतीनुसार लॉरेन्स बिष्णोई हा आपला आदर्श आहे. आपलाच नव्हे तर तो देशाचा आदर्श आहे. आम्ही एकाच गावचे आहोत. पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यातून आम्ही येतो. प्रसिद्धीच्या कारणामुळे मूसेवाला याची हत्या झाली नाही किंवा खंडणीचाही हेतू त्यामागे नव्हता तर विकी मिद्दुखेराला ज्या गँगस्टरनी मारले त्यांना आसरा देण्याचे व त्यांना अर्थ पुरवठा करण्याचे काम मूसेवालाने केले होते.

विक्रमजीत तथा विकी मिद्दुखेरा हा ३३ वर्षीय तरुण युवा अकाली दलाचा नेता होता. तो भटिंडा जिल्ह्यातील मिद्दुखेरा या गावचा होता. मूसेवाला प्रमाणे त्यानेही आपल्या गावाचेच नाव स्वतःला लावून घेतले होते. शिक्षण घेण्यासाठी तो चंदिगढला आला होता. अजयपाल सिंह या भावासह तो राहात होता. ७ ऑगस्ट २०२१ला मिद्दुखेराची हत्या झाली. लॉरेन्स बिष्णोईला त्याने पाठिंबा दिला होता.

हे ही वाचा:

आंबेनळी घाटात जात असाल तर सावधान!

पंतप्रधान उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना कानपूरमध्ये दगडफेकीचा घाट

उद्धवजी, सुख म्हणजे नक्की काय असतं?

अजितदादांची पलटी…

मिद्दुखेराची हत्या झाल्यानंतरही मूसेवालाचे नाव त्यात आलेले असतानाही पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही. म्हणून त्याला मारावे लागले. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारचा चुलत भावाच्या हत्येतही मूसेवालाचा हात होता. मीडियाने मूसेवालाचा कुठे कुठे सहभाग होता हे शोधून काढावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा