27 C
Mumbai
Tuesday, June 28, 2022
घरविशेषआंबेनळी घाटात जात असाल तर सावधान!

आंबेनळी घाटात जात असाल तर सावधान!

Related

महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट अशी आंबेनळी घाटाची ओळख. रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या घाट रस्त्याची लांबी ४० किलोमीटर इतकी आहे. इतिहासातील प्रतापगडाच्या छत्रछायेखाली येणारा हा घाट. या घाटाच्या दोन्ही बाजूला भरपूर आंब्याची झाडे व यातून जाणाऱ्या नळीसारख्या मार्गामुळे या घाटाला आंबेनळी घाट हे नाव पडले असावे. घाटमाथा चढून आल्यावर आपण महाबळेश्वरमध्ये प्रवेश करतो.

याच आंबेनळी घाटातला तो दिवस होता २८ जुलै २०१८. सकाळी सहाच्या सुमारास दापोली कृषि विद्यापीठातील कर्माचाऱ्यांची पावसाळी सहल महाबळेश्वरच्या दिशेने याच घाटाच्या दिशेने निघाली. साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. बसमधील ३१ पैकी ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी बरेच-आरोप प्रत्यारोप झाले. घाटावर बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत होते. अपघाताच्या ठिकाणी रेलिंग नव्हते. त्यामुळे ही बस २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर अपघाताच्या ठिकाणी रेलिंग बसवण्याचे काम करण्यात आले.

महाबळेश्वर-पोलादपूरदरम्यान आंबेनळी घाटाची गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे आतोनात हानी झाली होती. रस्त्याला तडा गेल्या. रस्त्यावर मोठमोठ्या दरडी कोसळल्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह घाटरस्त्यावरून वाहत होता. त्यामुळे मोठमोठे दगड रस्त्यावर आले. साहजिकच अनेक दिवस हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यानंतर सुरू झालेली कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच आहेत. आंबेनळी घाटरस्त्यासाठी साडेबारा कोटी, तर महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी ६४ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र, त्याचा एक रुपयाही मिळाला नसल्याने प्रमुख मार्गावरील कामे रखडली आहेत.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या २२ गावांचा संपर्कही या अतिवृष्टीमुळे तुटला होता. या नुकसानीला दहा महिन्यांचा काळ लोटूनही अनेक कामे निधीअभावी अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. काही कामे प्रगतीपथावर, तर काही अंतिम टप्प्यात आहेत. ४२ लहान पूल, ११० बॉक्सेलची कामे मंजूर आहेत. मात्र फक्त निधी उपलब्ध नसल्याने ही कामे रडतखडत सुरू आहेत.

निधी मंजूर झाला असला तरी काँट्रेक्टरला पैसे मिळत नाहीत. त्यामुळे तारांबळ उडाली आहे. पाऊस जवळ आला आहे. दरडी कोसळल्या तर त्या तातडीने उचलण्यासाठी घाटात फोकलेन आणि जेसीबीच्या अशा सहा मशीन ठेवण्यात येणार आहेत. प्रतापगडाजवळील ब्रीज पूर्ण झाले आहेत. गेल्या पावसात वाहून गेलेल्या संरक्षक भिंती ज्या जाळीत दगड लावून तयार करतो ते अजूनही तशाच आहेत. त्याची आता कामे सुरू झाली आहेत. पाण्याबरोबर जे मोठमोठे दगड, रेती वाहून आले होते ते रस्त्याच्या बाजूला त्याच अवस्थेत आहेत. त्याची साफसफाई अजूनसुद्धा झालेली नाही. जर पाऊस अतिप्रमाणात पडला तर ते दगड रस्त्यावर येऊन घाट बंद होण्याची संभावना आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. रस्त्याच्या बाजूला दोन्ही साइडला रेडियमचा जो व्हाइट पट्टा मारला जातो. तो अजूनही घाटात मारलेला नाही. धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठ्या अपघाताची संभावना आहे. दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. आंबेनळी घाटातील पर्यटक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. ते पूर्णपणे बंदी करण्याची मागणी होतेय. गेल्यावर्षी पावसात असंख्य दगड वाहून आले आहेत. जर एखादा दगड पाण्याबरोबर येऊन मोठा अपघात होऊ शकतो. प्रतापगड फाटा ते पोलादपूर या रस्त्याचं काम झालं आहे. असे प्रतापगडचे अभय हवालदार यांनी सांगितले.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटरस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह दरडीमुळे घाटरस्त्यावरूनच वाहत होता. त्यामुळे दरडींचा मळबा रस्त्यावरच पसरला होता. मेटतळे गावापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर मुख्य रस्ता ३० फूट खचल्याने वाहतूक बंद झाली होती.
रस्त्याच्या खालून जाणाऱ्या मोऱ्या म्हणजेच पर्जन जलवाहिनीचे काम अपूर्ण आहे. फक्त दोन ठिकाणी त्याचे काम झालेले आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम झालेले नाही. रेलिंगचे काम झालेले नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतात. डांबरीकरण केले आहे तेसुद्धा नित्कृष्ट दर्जाचे आहे. यावर्षी पावसात पोलादपूर ते महाबळेश्वर हा आंबेनळी घाट बंद होण्याची शक्यता आहे, असे पोलादपूर येथे राहणारे आनंद उत्तेकर सांगतात.

हे ही वाचा:

पंतप्रधान उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना कानपूरमध्ये दगडफेकीचा घाट

भावाच्या हत्येचा गँगने घेतला बदला

भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांत सहाव्या जागेसाठी चुरस निश्चित

‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’

अरुंद असलेल्या या घाटात अनेकदा विकासाच्या नावाखाली करोडो रुपयांची कामे करण्यात आली. अलीकडचे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेय. या मार्गाने नोकरी-व्यवसायानिमित्त गावकऱ्यांची दररोज ये-जा असते. याच मार्गावरून महाबळेश्वर, पांचगणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

पावसाळ्यात या घाटातील प्रवास म्हणजे संकटाला निमंत्रण अशी स्थिती वाहनचालकांची झाली आहे. घाटांचे रुंदीकरण, मोऱ्या वाढवणे, रिफ्लेक्टर फलक, बॅरी गेटर्स अशा कामांची पूर्तता करण्यात येत असली तरीही अनेक कामे बाकी राहिली आहेत. अतिवृष्टीमुळे खचणारा घाट अशी याची ख्याती. घाट पावसामुळे धोकादायक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागणार आहे. पावसाळ्यात तुम्ही आंबेनळी घाटातून जाणार असाल, तर पूर्ण काळजी घेऊन प्रवास करा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा