28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरक्राईमनामापोलीस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला घातली गोळी

पोलीस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला घातली गोळी

दिल्लीतली घटना; एक अटक, दोघे फरार

Google News Follow

Related

दिल्लीत एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कलकाजी मंदिर परिसरात पोलिस असल्याचे भासवून तिघांनी पीडित तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना दक्षिण-पूर्व दिल्लीतील आस्था कुंज पार्कमध्ये सोमवारी संध्याकाळी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. आसिफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, १७ वर्षीय मुलगी आणि तिचा मित्र आस्था कुंज पार्कमध्ये जाण्यापूर्वी कालकाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यानंतर ते पार्कमध्ये बसलेले असताना पोलीस असल्याचे भासवून साधारण २५ ते ३० या वयोगटातील तीन माणसे त्यांच्याजवळ आली आणि त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगत दोघांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मुलीला निर्जन ठिकाणी नेले. तक्रारीनुसार, दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या तिघांनी मुलीला आणि तिच्या मित्राला धमकी दिली.

पुढे पीडित मुलीने आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाने पोलिसांकडे तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि मंगळवारी सकाळी एका आरोपीला अटक केली. पोलिसांकडून सध्या उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम तसेच आरोपींनी पोलिस असल्याचे भासवून मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाला कशा प्रकारे धमकावले, याचा तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

साहिलला परीक्षागृहातून बाहेर नेल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगरमधून ४,७६५ किलो भेसळयुक्त ‘मावा’ जप्त

माध्यमांच्या प्रवेशबंदीनंतर व्हाइट हाऊसकडून ‘ट्रम्प टीव्ही’

भारत इंडो-पॅसिफिकमधील उदयोन्मुख महासत्ता!

आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. दक्षिण-पूर्व जिल्हा विशेष दलाचे प्रभारी इन्स्पेक्टर राजेंद्र डागर यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाला अमर कॉलनीतील डीएम ऑफिस रोडजवळ आसिफच्या हालचालींची विशिष्ट माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचला. एका पथकाने त्याला अमर कॉलनीजवळ अडवले. आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यावरही त्याने कथितरित्या पोलिस पथकावर तीन गोळ्या झाडल्या. या चकमकीत एक गोळी एका हेड कॉन्स्टेबलच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली. त्यानंतर त्या पोलिसाने आत्मसंरक्षणासाठी दोन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी आसिफच्या उजव्या पायाला लागली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा