28.7 C
Mumbai
Wednesday, July 15, 2026
घरक्राईमनामागडकरींची बदनामी, चार एन्फ्लुअर्सवर गुन्हा

गडकरींची बदनामी, चार एन्फ्लुअर्सवर गुन्हा

मनीष कश्यपने केले होते दिशाभूल करणारे व्हीडिओ

Google News Follow

Related

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने इथेनॉल (E20) धोरणाबाबत दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करत नागपूर सायबर पोलिसांनी प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यपसह चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तांत्रिक तपास करत असून संबंधित व्हिडिओंचा स्रोत आणि त्यामागील संभाव्य कटाचा तपास सुरू आहे.

नागपूर शहर भाजपच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. मनीष कश्यप याच्यासह Desi BoysNCR, हर्षित राठी आणि अंकलेश इनवाटे यांच्यावर एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इन्फ्लुएन्सर्सनी यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर असे व्हिडिओ प्रसारित केले, ज्यामध्ये इथेनॉल (E20) इंधनाच्या वापराशी संबंधित मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, फसवणूक आणि बोगस व्यवहार होत असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओंमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव कोणताही ठोस पुरावा नसताना जोडण्यात आले आणि त्यांच्या इथेनॉल धोरणाचे चुकीचे व दिशाभूल करणारे चित्रण करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, व्हिडिओ अधिक विश्वासार्ह वाटावेत यासाठी काही सामान्य नागरिकांच्या कथित बनावट किंवा दिशाभूल करणाऱ्या मुलाखतींचाही वापर करण्यात आला. यामागील उद्देश गडकरी यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिमा खराब करणे तसेच सोशल मीडियावर अधिक व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवणे हा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नागपूर सायबर पोलिसांनी प्राथमिक तपासात संबंधित व्हिडिओंमध्ये प्रसारित करण्यात आलेली माहिती तथ्यहीन आणि निराधार असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओंमध्ये दाखविण्यात आलेल्या कथित गैरव्यवहारांशी किंवा घटनांशी नितीन गडकरी यांचा कोणताही संबंध नसतानाही त्यांचे नाव वापरण्यात आले. तसेच या व्हिडिओंमुळे बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन आणि सनसनाटी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोशल मीडिया पोस्ट्स, व्हिडिओ आणि त्यांचा प्रसार याची तांत्रिक चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील शालीमार, नूर मोहम्मदीसह तीन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

E20 धोरणावर दिशाभूल करणारे व्हिडिओ; मनीष कश्यपसह चार इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध गुन्हा

भारत-चीनला अमेरिकेकडून मिळणार दिलासा? ५००% ऐवजी १००% शुल्काचा प्रस्ताव

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क, पुण्यातल्या ६६ जणांची चौकशी

दरम्यान, नितीन गडकरी यांनी इथेनॉल धोरणासंदर्भातील हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, पर्यायी इंधनांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला असून त्यामागील उद्देश वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करणे आणि भारताचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. तसेच E20 पेट्रोल नको असल्यास ग्राहकांना १०० टक्के पेट्रोलचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा