30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामा११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले...

११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले…

पतीने दहा मुलांसकट काढले पत्नीला बाहेर

Google News Follow

Related

ओडिशामध्ये अकराव्या मुलाच्या जन्मानंतर एका पतीने आपल्या दहा मुलांसह पत्नीला घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे. ओडिशामधील ओंझर जिल्ह्यातील ही घटना आहे. तेलकोई पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सालेकना गावात एक महिला आपल्या नवजात बाळासह आढळली. एका स्थानिक अशा कार्यकर्तीने काळ शनिवारी तिला रुग्णालयांत दाखल केले. आदिवासी परंपरेप्रमाणे रबी देहुरी या ४० वर्षीय व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी जानकी देहुरी हिने नसबंदी शस्त्रक्रिया केल्यामुळे ती कोणत्याच विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही.

जानकीने १९ जानेवारी २०२३ ला एका बाळाला जन्म दिला तेव्हा आशा कार्यकर्तीने तिला पटवून दिल्यानंतर तिने १४ फेब्रुवारीला त्याच रुग्णालयात नसबंदीची शस्त्रक्रिया केली. जानकीला पाच मुले आणि पाच मुली आहेत , त्यांची एक मुलगी काही वर्षांपूर्वी मरण पावली. रबीचे जानकीशी १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या शस्त्रक्रियेचे फायदे बघितल्यावर तिने शस्त्रक्रिया करन्यास मंजुरी दिली. रबीला अनेक वेळा समजावून त्याने शस्त्रक्रिया करणाया नकार दिला. रबीला त्याच्या पत्नीने घरात घ्यावे यासाठी खूप प्रयन्त केला पण त्याने जानकीला मारहाण केली.

हे ही वाचा:

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारतर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन

पी. चिदंबरम यांना झाला साक्षात्कार; मोदी सरकार इतके कमकुवत नाही

शरद पवारांनी मात्र हातच वर केले!

माझ्या पत्नीला अशा कार्यकर्तीने रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करून घेतली ज्याला माझी संमती हवी होती ज्यावेळेस मला कळले तेव्हा मला धक्का बसला. अशा कार्यकर्ते निर्मल चंद्र नायक म्हणाले की, आदिवासींमध्ये जनजागृतीचा अभाव आणि शस्त्रक्रिया म्हणजे कलंक असे समजत असल्यामुळे अशा घटना घडतात.

उपविभागीय दंडाधिकारी रामचंद्र किसकू म्हणाले की, ब्लॉक विकास अधिकारी आणि तेल कोई तहसीलदारांना या संपुर्ण प्रकरणाची चौ कशी करून अहवाल सादर करायला सांगितलं आहे. शिवाय गावकऱ्यांबरोबर आणि तिच्या पतीबरोबर चर्चा करून तिच्या नवजात बालकाच्या पुनर्वसनासाठी यौग्य ते उपचार करणार असल्याचे सांगितले. वारंवार गर्भधारणा होऊन आईच्या जीवाला धोका निर्माण होतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे आई निरोगी राहते असे स्त्रीरोग तज्ज्ञ मंत्रानी जैंना म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा