26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामालेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

लेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

Related

मुंबई आणि आसपासच्या परिसरातून ड्रग्जविरोधी कारवायांना जोर आला असून मुंबई गुन्हे शाखेनेही मोठी कारवाई करत शिवडी येथून पाच कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने ही मोठी कारवाई केली आहे.

मुंबई परिसरातील शिवाडीच्या आणिक आगार परिसरातून पोलिसांनी ५ कोटी रुपयांचे पाच किलो ९०० ग्रॅम एमडी आणि ४० लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. महिलांच्या वापरात असणाऱ्या पर्समध्ये हे अमलीपदार्थ लपवण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उठवत ५०० गुन्ह्यांची नोंद केली आहे. तसेच वर्षभरात ६२० आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवायांदरम्यान पोलिसांनी १३५ कोटी किंमतीचे ४ हजार किलो ड्रग्ज जप्त केले आहे.

हे ही वाचा:

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

दक्षिणेत पुराचे थैमान सुरूच

ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?

काही दिवसांपूर्वीच मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावमध्ये धडक कारवाई करत तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला होता. त्यापूर्वी श्रीनगरमधून २४ किलो चरस मुंबईला पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी १४ कोटी ४० हजार किंमतीचा २४ किलो चरस जप्त करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा