९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या नौशादला उत्तर प्रदेशच्या हापूर येथून अटक करण्यात आली आहे. दिल्लीला आणले जात असताना आरोपी नौशादने पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने कॉन्स्टेबल अमित मानवर ब्लेडने हल्ला केला, प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली आणि ताब्यात घेतले. आरोपी आणि कॉन्स्टेबलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेलकम पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोलिसांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी नौशादने सांगितले की, त्याने दारू पिऊन हा गुन्हा केला आहे आणि त्याला त्याच्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. आरोपीने सांगितले की त्याचा त्याच्या पत्नीशी वाद होत होता आणि ९ वर्षीय मुलगी त्याला ओळखत होती.
ईशान्य दिल्लीतील दयालपूर भागात बकरी ईदच्या सणादरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली. आरोपी नौशादने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिला सुटकेसमध्ये बंद केले आणि पळ काढला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला तेव्हा ती एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळली.
हे ही वाचा :
माझ्या बकऱ्याला का मारले? पाकिस्तानच्या लहानग्याला अश्रु अनावर
राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपीची बहिण काय म्हणाली ?
दक्षिण कोरियन लष्कराने उत्तर कोरियाविरोधातील काय केले बघा
मुलीचा मृतदेह तिच्या सुटकेसमध्ये आढळल्यानंतर, तिला ताबडतोब जवळच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीय तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप केल जात असून मुलीचे कुटुंब आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
