बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांच्या बळींविरोधात बरीच चर्चा देशभरात रंगली होती. मुक्या प्राण्यांचे बळी देऊन ईद साजरी करू नका, असा संदेशही दिला जात होता. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा होत होती. आता पाकिस्तानातील एका लहान मुलाचा व्हीडिओ व्हायरल होत असून त्यांच्याकडील बकऱ्याचा बळी दिल्यानंतर त्या मुलाची भावना या व्हीडिओतून दिसत आहे.
यंदाच्या ७ जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात आली. व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी मुलगा ओक्साबोक्शी रडत आहे. या मुलाच्या घरी आणलेल्या बकऱ्याचा त्या मुलाला लळा लागलेला असावा त्यामुळे त्या बकऱ्याला मारण्यात आल्यानंतर त्या मुलाला ते सहन झालेले नाही. तो मुलगा आपल्या आईवडिलांना म्हणतोय, ‘माझ्या बकऱ्याला मारलं…’ यावर त्याच आई म्हणताना ऐकायला येते की, ‘आम्ही सांगितलं होतं ना, बकऱ्याला अल्लाहकडे जायचं आहे. म्हणून त्याची बळी देण्यात आली… बकरा आता अल्लाहला तुझ्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेल… त्यानंतर अल्लाह तुला चांगल्या भेटवस्तू देखील देतील…’
हे ही वाचा:
अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर का उतरले?
यमनच्या हूती गटाने क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
ईडीकडून काँग्रेस खासदार व तीन आमदारांच्या घरांवर छापे
‘ऑपरेशन सिंदूर’च्या नायकाचा कसा केला इंडिगोने गौरव
व्हिडीओमध्ये कुटुंबिय मुलाची समजूत घालताना दिसत आहेत. पण मुलाचं रडणं काही थांबत नाही. मुलगा रडत रडत म्हणतो, ‘माझ्या बकऱ्याला सुरीने कापलं. ज्यामुळे तो मेला.’ हे सांगत असताना सातत्याने मुलगा रडत आहे, त्याच्या डोळ्यांतून अश्रुंची धार लागली आहे.
انکل نے میرے بکرے کو چھری سے چی چی کر دیا😭😭😭 pic.twitter.com/HnaZXniADI
— Faizan Shaikh (@FaiziWithKhan) June 7, 2025
बकरी ईदनिमित्त, पाकिस्तान सरकारने अहमदिया मुस्लिमांना कुर्बानी देण्यास बंदी घातली होती. जर कोणी कुर्बानी देताना आढळलं तर त्याला ५ लाख रुपये दंड भरावा लागेल अशी घोषणा त्यांनी केली होती. यासाठी, ते प्रत्येक अहमदिया मुस्लिमांच्या घरी गेले आणि कोणत्याही अहमदियाच्या घरी प्राणी आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय मुस्लिम देश असलेल्या मोरोक्कोमध्ये मेंढ्यांच्या कुर्बानीवरही बंदी घालण्यात आली होती. याचं कारण म्हणजे गेल्या ६ वर्षांपासून मोरोक्कोमधील लोक दुष्काळाचा सामना करत आहेत.
