24 C
Mumbai
Thursday, September 22, 2022
घरक्राईमनामाएनआयए आणि ईडीची दहा राज्यांमध्ये पीएफआयवर कारवाई, शंभरहून अधिक अटक

एनआयए आणि ईडीची दहा राज्यांमध्ये पीएफआयवर कारवाई, शंभरहून अधिक अटक

महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एनआयएचे छापे सुरूच आहेत.

Related

दहशतवादाविरोधातील मोहिमेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, २२ सेप्टेंबरला सकाळी मोठी कारवाई केली आहे. जवळपास दहा राज्यांमधील १०६ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. याप्रकरणी शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर कर्नाटक, केरळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे.

एनआयएने दहशतवादाला आर्थिक मदत, प्रशिक्षण शिबिरांमध्ये गुंतलेल्यांच्या निवासस्थानांची आणि अधिकृत ठिकाणांची झडती घेतल्याचे माहिती आहे. महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एनआयएचे छापे सुरूच आहेत. तपास यंत्रणांनी राज्य पोलिसांच्या सहकार्याने सुमारे दहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआयचे मुख्य परवेज अहमदलाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेनकाशीसह अनेक ठिकाणी पीएफआय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. तसेच चेन्नईतील पीएफआयच्या राज्य मुख्यालयातही झडती सुरू आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई, भिवंडी आणि पुणे या ठिकाणी छापेमारी झाली असून महाराष्ट्रातून वीस जणांन अटक करण्यात आली आहे.

राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या घरांवरही छापे टाकले आहेत. यासोबतच या वेळी एजन्सींनी मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील पक्षाचे अध्यक्ष सलाम पराड यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सलाम यांच्यावरील कारवाईविरोधात पक्ष कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू आहेत.

हे ही वाचा:

तीस्ताला नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती

तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?

दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी नाही?

गल्लीतले मोदी आणि दिल्लीतले अरविंद सावंत

दरम्यान, यापूर्वी रविवारीही छापे टाकण्यात आले होते. रविवारी एनआयएने आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकले होते. त्यादरम्यान पीएफआय सदस्यांना चौकशीसाठी नेण्यात आले. तपास यंत्रणेने हिंसाचार आणि बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,957चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
38,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा