36 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरक्राईमनामामहाराष्ट्र इसिस मॉड्युलच्या ६ जणांविरुद्ध आरोपपत्र

महाराष्ट्र इसिस मॉड्युलच्या ६ जणांविरुद्ध आरोपपत्र

दहशतवादी संघटना इसिसशी संबंधित असल्याचा आरोप

Google News Follow

Related

महाराष्ट्र इसिस मॉड्युलच्या ६ प्रमुख आरोपी विरोधात एनआयएकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई, शर्जील शेख, आकीफ अतीक नाचन, तसेच जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि पुण्यातील डॉ.अदनानली सरकार अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत.

ताबीश,झुल्फिकार अली आणि शर्जील शेख हे मुंबईत राहणारे असून अफिक आणि जुबेर हे दोघे पडघा- बोरिवली येथे राहणारे आहेत. अटकेत असणारे सर्व प्रतिबंधित इसिस संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांनी लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवण्याच्या आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष आचारसंहिता आणि संस्कृती आणि लोकशाही शासन प्रणालीच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटनेच्या दहशतवादी कारवायांना पुढे नेण्याचा कट रचला होता असे एनआयए ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

झुल्फिकार अली बडोदावाला आणि आकीफ अतीक नाचन यांच्यावर यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आयईडी बनवल्या प्रकरणी पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एनआयए विशेष न्यायालय आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यातील आरोपी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या हिंसक आणि अतिरेकी विचार सरणीचा सक्रियपणे प्रचार करण्यात गुंतले होते, तसेच दहशतवादी कृत्य,हिंसेची पूर्व तयारीसाठी संशयित आरोपीनी जिहादीना संघटनेत सामील करून मोठ्या घातपाताचा कट रचला होता असे आरोप पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

बर्गरमुळे भारतीय टीमचे सँडविच

ऐकतेस ना ज्ञानदा? भाडखाऊंचे प्रलाप

करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!

मायावतींना व्हायचे आहे आता पंतप्रधान !

ताबिश आणि झुल्फिकार या दोन संशयितांनी इसिसच्या स्वयंभू खलिफा (नेत्या) शी निष्ठा (बयाथ) घेतली होती असे ही नमूद करण्यात आले आहे.

एनआयएच्या मुंबई शाखेला इसिस या संघटनेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ आणि ‘व्हॉईस ऑफ खुरासान’ सारख्या प्रचार नियतकालिकांसह हिजरा ते सीरियाशी संबंधित अपराधी सामग्री आरोपीकडे मिळून आली होती, पुढे, आरोपी त्यांच्या संपर्कांसोबत डी आय वाय (डू इट युवरसेल्फ) किट शेअर करत होते. एनआयएच्या तपासा नुसार आरोपी त्यांच्या दहशतवादी योजना आणि डिझाईन्ससाठी वित्तपुरवठा करण्यासाठी निधी उभारत असल्याचेही आढळून आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा