31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामाअभिनेत्री नोरा फतेह आली ईडी कार्यालयात; जॅकलिनलाही समन्स

अभिनेत्री नोरा फतेह आली ईडी कार्यालयात; जॅकलिनलाही समन्स

Google News Follow

Related

अभिनेत्री नोरा फतेहीला २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेला आहे. त्यामुळेच नोराला चौकशीसाठी ईडी कार्यालय गाठावे लागले आहे. सुकेश चंद्र शेखर यांच्यावर नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलीनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे.

सुकेश चंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल तिहार जेलच्या आतून २०० कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की, इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते.

याआधी जॅकलीनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटले की जॅकलीन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची बळी आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलिनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सांगितली होती. नोराला समन्स बजावल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज होणाऱ्या प्रश्नात नोरा सामील होणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, नोरा आज चौकशीकरता बोलावण्यात आलेले आहे.

 

हे ही वाचा:

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रोत्सव

५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाला घेतले ताब्यात

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

पुन्हा एकदा ‘मौका मौका’

 

सध्या फसवणुकीच्या प्रकरणात सुकेशची कथित पत्नी लीना पॉलही पोलिसांच्या ताब्यात आहे. फसवणुकीच्या प्रकरणात लीनाने सुकेशला पूर्ण पाठिंबा दिला. तुरुंगातूनच सुकेश लीनाच्या माध्यमातून आपले नेटवर्क चालवत होता. सुकेशशी संबंधित दिल्ली पोलिसांच्या ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईचे आदेश देण्यात आले, ज्यांनी कारागृहाच्या आतून फसवणुकीचे गुन्हे केले. या प्रकरणात सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधीच निलंबित करण्यात आले होते. खंडणीच्या प्रकरणात हे सर्वजण चौकशीनंतर दोषी आढळले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा