28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरराजकारणजावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गुरुवार १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आपल्या जावयाच्या बचावासाठी रिंगणात आलेले पहायला मिळाले. ‘माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. त्याच्याकडे जे सापडले तो हरबल तंबाखू होता’ असा दावा मलिक यांनी केला आहे. तर ‘एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो का?’ असा सवालही त्यांनी विचारला आहे. ड्रग्सच्या प्रकरणात आपल्या जावयाला अडकवले जात असल्याचाही दावा नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणात आपला जावई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

गेले काही दिवस नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीवर निरनिराळे आरोप करत आहेत. हीच आरोपांची मालिका त्यांनी आजही सुरू ठेवली. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील क्रूज ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईवरून एनसीबीवर टीका करणारे मलिक यांनी आज त्यांच्या जावयावर झालेल्या कारवाईचा दाखला देत एनसीबीवर निशाणा साधला. कॉर्डिला क्रूज पार्टीवरिल कारवाईनंतर नवाब मलिक हे आक्रमक झालेले दिसले होते. या कारवाईत भाजपाचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे आरोप केले होते. तर भाजपाने सुरूवातीपासूनच मलिक हे जावायावर कारवाई झाल्यामुळे एनसीबीवर टीका करत असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा:

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रोत्सव

मलिक यांचा जावई समीर खान याच्यावर १३ जानेवारी रोजी कारवाई करत एनसीबीने त्याला अटक केली. यावर भाष्य करताना मलिक म्हणाले की या छाप्यात साडे सात ग्राम गांजा फर्निचरवाला याच्याकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच एनसीबीला तंबाखू आणि गांजा मध्ये फरक कळत नाही याचे आश्चर्य वाटते असा टोला त्यांनी लगावला आहे. तर या संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला चाचणी करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही आपल्या जावयाला गोवण्यात आल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. ‘समीर खान यांना साडे आठ महिने तुरुंगात राहिल्यानंतर एनडीपीएसच्या न्यायालयाने जामीन दिला. त्यासंदर्भातील लेखी ऑर्डर आम्हाला मिळाली नव्हती जी काल कोर्टाच्या पोर्टलवर अपलोड झाली. त्यात जावयाकडे गांजा नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे’ असा दावा मलिक यांनी केला. तर या सगळ्या कारवाईने आपली मुलगी ट्रॉमामध्ये गेली असून त्यांच्या मुलावर देखील परिणाम झाला असे म्हणत भावनिक साद नवाब मलिकांनी घातली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा