27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरक्राईमनामाबिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !

बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !

पोलिसांकडून आरोपींना अटक

Google News Follow

Related

सध्या देशात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावरून पुन्हा एकदा महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. यामध्ये अशाही महिला आहेत, जे अत्याचाराला बळी न पडता धाडसी कृत्य करून आपला बचाव करतात. असेच धाडसी कृत्य एका नर्सने करून नराधमांच्या हातून सुटका केली आहे. बलात्काराच्या प्रयत्नेत असलेल्या डॉक्टरचे गुप्तांगच नर्सने कापून टाकले आहे.

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयातील ही घटना आहे. डॉक्टरने अन्य दोन साथीदारांसह नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशा वेळी नर्सने डॉक्टरचे गुप्तांग सर्जिकल ब्लेडने कापून स्वत:चा बचाव केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे प्रशासक डॉ संजय कुमार, सहकारी सुनील कुमार गुप्ता आणि अवधेश कुमार अशी आरोपींची नावे आहेत.

हे ही वाचा :

मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !

माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

राजकोट पुतळा प्रकरण: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सरकारी फाईल्सवर सही करायची नाही! केजरीवालांना न्यायालयाचे आदेश

पोलिसांनी सांगितले की, नर्सवर हल्ला करण्यापूर्वी तिघांनी हॉस्पिटलला आतून कुलूप लावले होते आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. लैंगिक अत्याचारापूर्वी त्यांनी मद्यपान केले होते. तिघांनी मिळून नर्सवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा परिस्थितीत नर्सने आपला बचाव करण्यासाठी सर्जिकल ब्लेड पकडले आणि डॉक्टरचे गुप्तांग कापून टाकले आणि नराधमांच्या तावडीतून स्वत:ला सोडवून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जखमी झालेल्या डॉक्टरवर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा