27 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरक्राईमनामामूतखडा काढण्याच्या निमित्ताने किडनीच काढली!

मूतखडा काढण्याच्या निमित्ताने किडनीच काढली!

किडनी स्टोन ऑपरेशनच्या बहाण्याने त्यांची किडनी एका खाजगी रुग्णायालय द्वारा काढण्याची माहिती समोर आली आहे

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश मध्ये नुकतेच नियुक्त झालेले सुरेश चंद्र ह्यांना त्यांची डावी किडनी नसल्याचं लक्षात आलं. किडनी स्टोन ऑपरेशनच्या बहाण्याने त्यांची किडनी एका खाजगी रुग्णायालय द्वारा काढण्याची माहिती समोर आली आहे. ह्या प्रकरणाची तपासाची जबाबदारी सीडीओ वर टाकण्यात आली आहे.

कासगंज येथील मुख्य विकास अधिकारी (सीडीओ) कार्यालयात प्रतिनियुक्त सुरेश चंद्रा यांना अलीकडेच ओटीपोटात तीव्र वेदना होत होती.अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये त्यांची डाव्या किडनी गायब असल्याचे दिसून आले. अहवालात नमूद झालेले तपशील : डावी किडनी – डाव्या मूत्रवाहिनीच्या वरच्या भागात यूरेटरिक कॅल्क्युलस जमले आहे , ज्यामुळे ग्रॉस हायड्रोनेफ्रोसिस होतो.

मला किडनी स्टोन असल्याचे निदान झाले. कासगंजमधील एका खाजगी निदान केंद्राच्या बिलिंग काउंटरवरील व्यक्तीने मला अलीगढमधील क्वार्सी बायपास रोडवरील एका खाजगी रुग्णालयात रेफर केले. तिथे मला १४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. त्याच दिवशी ऑपरेशन करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मला कळवले की माझा किडनी स्टोन काढला गेला आहे आणि औषधांची यादी लिहून दिली आहे. त्यांनी मला १७ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. २९ ऑक्टोबर रोजी मला ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या. मी कासगंजमधील डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी माझे पूर्वीचे निदान अहवाल पाहिल्यानंतर आणि माझ्या पोटाच्या डाव्या बाजूला असलेल्या शस्त्रक्रियेच्या वर्णाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर, अल्ट्रासाऊंड स्कॅनचा आदेश दिला. माझी डाव्या किडनी गायब असल्याचे कळून मला धक्काच बसला. मी खाजगी रुग्णालयात कॉल केला, जिथे डॉक्टरांनी स्टोन काढण्याच्या बहाण्याने माझी किडनी चोरली, पण त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी मला योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे,” सुरेश म्हणाला.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे

आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील

खासगी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पहिली शस्त्रक्रिया १५ एप्रिलला होणार होती. तथापि, त्यांनी त्याच्या नातेवाईकांची वाट पाहण्यास नकार दिला आणि घाईघाईने शस्त्रक्रिया सुरू केली. त्यांनी त्याच्या कुटुंबाला आत येऊ दिले नाही. तो ऍनेस्थेसियावर होता म्हणून त्याला डॉक्टर कोण हे आठवत नव्हते. त्यामुळे २८ हजार भरल्यानंतर त्याला सोडण्यात आल्याचे सुरेश ह्यांनी सांगितले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा