27 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरविशेषबेस्टमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट

बेस्टमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट

बेस्ट बसमध्ये वाहक व चालकांची नजर चुकवून प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

Google News Follow

Related

मुंबईत सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. तसेच बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. बेस्टबसमध्ये वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत हे प्रवासी बस मधून विनातिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत. तसेच कोरोना काळानंतर विनावाहक सोडलेल्या या बसमध्ये मोठ्या प्रमाणात विनाटिकीत प्रवास केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

कोरोना काळात वाहक व चालक यांची संख्या कमी झाल्यामुळे बेस्ट बसने विनावाहक बस सेवा सुरू केली होती. २०२२ सप्टेंबरमध्ये ११० मार्गावर विनावाहक बस सेवा सुरू करण्यात आली होती. विनावाहक सेवेमुळे फुकट्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे आता ही सेवा ६५ करण्यात आली आहे. बेस्टने २०१९ पासून आतापर्यत बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल १ लाख १३ हजार २७९ प्रवाशांनवर आता पर्यत कारवाई केली आहे.

तर या कारवाई केलेल्या दंडामधून बेस्टला ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी बेस्टमधून प्रवास करीत आहेत. तर या प्रवासी संख्येत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहेत. मात्र तिकीट तपासनीसांचे संख्याबळ तसेच बस आणि थांब्यांची संख्याबळ कमी असल्याने सर्वच फुकट्या प्रवाशांना पकडणे शक्य नाही. होत नसल्याचे असे बेस्टने सांगितले.

हे ही वाचा:

हिमाचलमध्ये आजी म्हणाली, मोदी हमारा बच्चा है, उसने देश बचाया!

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम, शिंदे गटात सामील

तसेच विनावाहक बेस्टमध्ये काही प्रवासी चालकांची नजर चुकूवून बसमध्ये चढतात व विनातिकीट सर्रास प्रवास करतात. तर काही वेळा बस थांब्यावर वाहक उपलब्ध नसल्याचे शेवटचा थांबा येई पर्यत प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही. तसेच बेस्टने दिलेल्या महिती नुसार २०१९ मध्ये एकूण ३७ हजार ९६४ प्रवाशांना पकडण्यात आले आहे. तर २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्याच्या कालावधीमध्ये २७ हजार २८९ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा