27.6 C
Mumbai
Tuesday, June 24, 2025
घरक्राईमनामापानिपतमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक!

पानिपतमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक!

हरियाणा पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

हरियाणातील पानिपत येथून एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एका संशयित हेराला अटक करण्यात आल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले. नौमन इलाही असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नौमानवर पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी इक्बालला देशाची संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप आहे. पानिपत पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण संस्थेने (सीआयए) या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. चौकशीत असे आढळून आले की नौमान हा बऱ्याच काळापासून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता आणि व्हॉट्सअॅपद्वारे गुप्तचर माहिती शेअर करत होता.

आरोपीचे नौमन इलाही मूळचा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैराना शहरातील मोहल्ला बेगमपुरा येथील रहिवासी आहे. आरोपी जिल्ह्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पानिपतचे प्रभारी एसपी राम पुनिया म्हणाले की, इलाही पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात होता आणि त्यांना संवेदनशील माहिती पुरवत होता. नोकरीदरम्यान तो भारतातील लहान-मोठ्या कारवायांची माहिती गोळा करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तो ती माहिती पाकिस्तानातील त्याच्या संपर्कांना पाठवत असे. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना देशाच्या लष्कराची आणि इतर महत्त्वाच्या कारवायांची माहिती पुरवत असे.

हे ही वाचा : 

डोळे बांधले, शिवीगाळ केली, सीमेवरील अधिकाऱ्यांबद्दल विचारले… बीएसएफ जवानाने सांगितला अनुभव

“युद्धबंदीसाठी पाकिस्तान पायात शेपूट घालून धावत होता!”

शाहबाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल; पसरूर लष्करी छावणीत सैनिकांची घेतली भेट

पुलवामामध्ये जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी नौमानने सांगितले की त्याचे पालक (अहसान इलाही आणि कोसर बानो) पाच वर्षांपूर्वी मरण पावले होते. तो बराच काळ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता आणि त्याच्या मोबाईल नंबरद्वारे गुप्तचर माहिती शेअर करत होता. पानिपत पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नौमानची चौकशी सुरू आहे आणि लवकरच या प्रकरणात अधिक माहिती समोर येईल. पोलिसांनी नौमानचा मोबाईल आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. पुढील कारवाई सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
253,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा