27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामापरमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?

परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?

Related

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल आणि युनिट ११ चे पोलीस निरीक्षक यांच्याकडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. बिमल अग्रवाल या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात परमबीर यांची ही चौकशी सुरू आहे.

बोहो बार अँड रेस्टॉरंटचे मालक बिमल अग्रवाल यांनी वाझे आणि परमबीर यांच्याविरोधात तक्रार केली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ११ करत आहे. आज फरार घोषित करण्यात आलेले परमबीर सिंग हे मुंबई पोहोचल्यानंतर थेट युनिट ११ च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचलेत.

परमबीर यांना ६ डिसेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून संरक्षण मिळाले आहे, त्यामुळे त्यांना अटक करता येणार नाही. परमबीर हे चौकशीत सहकार्य करण्याच्या उद्देशाने मुंबईत आल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबई आणि ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत शिवाय राज्य गुन्हे शाखेकडे काही गुन्ह्यांचा तपास आहे. या सर्व प्रकरणात परमबीर वॉन्टेड असल्याचं म्हणण्यात आलं होतं.

 

हे ही वाचा:

शशिकांत शिंदे पडला, त्याला शिवेंद्रराजे जबाबदार

‘महाराष्ट्र बंद’ करणाऱ्या मविआने ३ हजार कोटीची भरपाई द्यावी!

अमेरिकेतही दुमदुमला रा.स्व.संघाचा घोष

वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले

 

किला कोर्टाने त्यांना प्रोक्लेमेशन अबस्कॉन्डर म्हणजे फरार घोषित केले होते आणि ३० दिवसांत हजर राहण्यास सांगितलं होतं. परमबीर आज युनिट ११ मध्ये पोहोचलेत लवकरच कोर्टात हजेरी लावून बी नोटीस ते रद्द करवून घेतील. परमबीर यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर ते परदेशात असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण ते भारतातच असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा चंदीगढमध्ये लागला. तिथे त्यांचा मोबाईल फोन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा