30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरक्राईमनामाबिडीच्या वादातून लोकलमध्ये प्रवाशावर शस्त्राने हल्ला

बिडीच्या वादातून लोकलमध्ये प्रवाशावर शस्त्राने हल्ला

कसारा लोकलमधील ठाकुर्लीजवळील घटना

Google News Follow

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार चिंतेचा विषय बनत आहे. किरकोळ वादानंतर प्रवाशांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धावत्या कसारा लोकलमध्ये बिडी ओढण्यास विरोध केल्याने एका प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात भरत टोपले यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. ठाकुर्ली स्थानकाजवळ हा प्रकार घडला असून, हल्ल्यानंतर तिन्ही तरुण फरार झाले आहेत.

माहितीनुसार, उल्हासनगर येथे राहणारे भरत टोपले शुक्रवारी पहाटे कसारा-सीएसएमटी धीम्या लोकलने प्रवास करत होते. ते कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शहाड येथील प्रतिनिधी आहेत. लोकलच्या सामानाच्या डब्यात प्रवास करत असताना त्यांना तीन तरुण बिडी ओढताना दिसले. बिडीचा धूर डब्यात पसरत असल्याने त्यांनी संबंधित तरुणांना धूम्रपान करण्यास विरोध केला. रेल्वेच्या डब्यात बिडी ओढणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना जाब विचारला.

मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने तरुणांनी टोपले यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले. लोकल कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान असताना एका तरुणाने धारदार शस्त्राने टोपले यांच्या चेहऱ्यावर, डोळ्याजवळ वार केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. सुदैवाने त्यांचा डोळा बचावल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : 

‘आम आदमी’ केजरीवालांचा चमचमता शीशमहल जनतेसाठी खुला

जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

हल्ल्यानंतर तिन्ही तरुण लोकलमधून उतरून पसार झाले. जखमी अवस्थेत टोपले यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून फरार तरुणांचा शोध घेतला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा