27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरक्राईमनामाबापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ

बापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ

Related

कोट्यवधींचा गंडा घालणारा आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने एका पंचतारांकित हॉटेलमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नंदलाल केसर सिंग असे आरोपीचे नाव आहे.

आरोग्य विमा काढून देण्याच्या बहाण्याने ६८४ कोटींची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी २०१८ पासून फरार होता.

नंदलाल याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अनेक नावांनी कंपन्या सुरू करून आरोग्य विमा आणि इतर योजना देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक केली होती. फिनॉमिनल हाऊसिंग फायनान्स इंडिया लि., फिनॉमिनल हेल्थकेअर सर्व्हिसेस, फिनॉमिनल प्लांटेशन लि. या नावाने त्याने भारतात कंपनी स्थापन केल्या होत्या. विविध आकर्षक योजना ठेऊन त्याने देशभरात मार्केटिंगची साखळी तयार केली. केरळमध्ये त्याने रुग्णालयही सुरू केले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवल्याने अनेक नागरिकांनी नंदलाल याच्या कंपनीत गुंतवणूक केली. परतावा देण्याच्या वेळी टाळाटाळ केल्यामुळे देशातील विवध ठिकाणी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले. त्यानंतर नंदलाल नेपाळला फरार झाला होता.

हे ही वाचा:

बसमध्ये उभ्याने प्रवास करणारे वाढले

ठेकेदारांची ८०० कोटींची देयके द्यायची तरी कुठून?

…आणि काबुलमधून महिला फुटबॉल संघाला अलगद काढले बाहेर

उद्धव ठाकरेंना भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

नंदलाल विरुद्ध पोलिसांनी लूकआउट नोटीसही काढली होती. मार्चमध्ये नंदलाल मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या पत्नीच्या नावाने खोली भाड्याने घेऊन राहत होता. नंदलाल मुंबईत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोगसिद्ध ओलेकर यांना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला अटक केली. तीन वर्षांच्या कालावधीत नंदलाल नेपाळमध्ये राहत होता. दरम्यानच्या काळात त्याने अमेरिका, लंडन येथेही वास्तव्य केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा