31 C
Mumbai
Saturday, May 23, 2026
घरक्राईमनामाअल्पवयीन मुलीची बदनामी; गुजरातमधून एकीला अटक

अल्पवयीन मुलीची बदनामी; गुजरातमधून एकीला अटक

सोशल मीडियावर वापरले होते अपशब्द

Google News Follow

Related

सोशल मीडियावर अश्लील व बदनामीकारक संदेश प्रसारित करून अल्पवयीन मुलीची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपी महिलेला गुजरातमधून अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १९ एप्रिल २०२५ रोजी व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबंधित मुलीविरोधात आक्षेपार्ह व अश्लील मजकूर प्रसारित करण्यात आला. या संदेशांमधून मुलीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवून पीडितेची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

टीसीएस प्रकरण बनावट असल्याचा डाव्यांचा अजब सत्यशोध

पश्चिम बंगालमध्ये रेशन घोटाळ्यावर ईडीची धडक कारवाई

प्रसिद्ध अभिनेत्याच्या अल्पवयीन मुलीकडून नग्न फोटो मागणाऱ्याला अटक

अरविंद केजरीवालांच्या भ्रष्टाचार, गुंडागर्दी आणि खोटेपणामुळे पक्ष सोडला

दरम्यान, कारवाई करत पोलिसांनी गुजरातमधील एका हॉटेलमधून एका आरोपीला अटक केली. ती मागील दहा दिवसांपासून फरार होती. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
तपासादरम्यान चॅट रेकॉर्ड, संदेश आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले जात असून या प्रकरणामागे आणखी कोणते जाळे किंवा कट आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे, एका आरोपीने पोलिसांना धमकी देत गंभीर परिणाम भोगावे लागतील, तसेच गणवेश उतरवण्यास भाग पाडू, अशी धमकी दिल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच उर्वरित आरोपींवरही कारवाई केली जाईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा